राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी) / mahadbt scholorship scheme 2023


mahadbt-scholorship-scheme-2023


नमस्कार विद्यार्थी मित्रहो आज या लेखामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी) mahadbt scholorship scheme 2023 या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, लागणारी पात्रता, मिळणारी शिष्यवृत्ती आणि असणारी अर्जप्रक्रिया अशी संपर्ण माहिती पाहणार आहोत. 


मित्रहो तुम्हाला पण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य वाचा. 


ही योजना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे. सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस (CAP) च्या अंतर्गत डिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविलेल्या आर्थिक मागासवर्गीयांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. 



राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना उद्देश 

mahadbt scholorship scheme 2023


  • शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.

  • विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे

  • उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.

  • पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.

  • आर्थिक मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी. 

  • विद्याथ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.

  • कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये.



राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना वैशिष्ट्य 

mahadbt scholorship scheme 2023


  • या योजनेमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनतील त्यांना पैशासाठी कोणावर ही अवलंबून राहायची गरज राहणार नाही. 

  • भरपूर विद्यार्थी ही आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत असतात अश्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. 

  • ही योजना महाराष्ट्र  शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद विभागाकडून राबविण्यात आली आहे.

  • या योजनेनुसार मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.

  • या योजनेसाठी असणारी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन व सोपी करण्यात आली आहे ज्यामुळे अर्जदार विद्यार्थी ही घरी बसून मोबाईल आणि लॅपटॉप च्या सहाय्याने अर्ज करून शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू शकतील ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्हीपण बचत होतील. 

  • या योजनेचा लाभ मुलगा आणि मुलगी दोघेपण घेऊ शकणार आहेत.

  • या योजनेनुसार लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. 



राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मिळणारे लाभ 



या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क 50% आणि परीक्षा शुल्क 50% प्रदान करण्यात येतील. 




राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना असणारी पात्रता 



  • अर्जदार विद्यार्थी ही भारताची नागरिक असणे जरूरी असेल. 

  • अर्जदार विद्यार्थी ही महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. 

  • शासन निर्णयांमध्ये उल्लेखल्याप्रमाणे अर्जदार विद्यार्थी हा व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमासाठी ( डिप्लोमा / ग्रॅज्युएशन / पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री ) प्रवेश घेतलेल्या “”संस्थेचा ( प्रमाणित ) बोनफाईड विद्यार्थी “” असावा. 

  • अमान्यताप्राप्त विद्यापीठ आणि खाजगी विद्यापीठ या मधील विद्यार्थी या योजणेसाठी पात्र ठरणार नाहीत.

  •  अर्जदार विद्यार्थ्याने केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून दाखल होणे आवश्यक आहे. 

  • अर्जदार विद्यार्थ्याने इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ नये. 

  • कुटुंबाच्या फक्त 2 मुलांना चालू शैक्षणिक वर्षामध्ये या योजनेचा लाभ देण्यात येईल. 

  • मागील सत्रामध्ये किमान 50% उपस्थिती आवश्यक आहे. ( कॉलेजमध्ये नव्याने भरती झाल्यास अपवाद ) 

  • अभ्यासक्रम कालावधी दरम्यान , अर्जदाराचे दोन वर्षांपेक्षा जास्त अंतर नसावे. 

  • सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतलेला असेल असे विद्यार्थी पात्र असतील. 




राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना लागणारी कागदपत्रे  



  1. 10 वी ( एस. एस. सी ) आणि त्यानंतरच्या शैक्षणिक गुणपत्रिका 

  2. महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी प्रमाणपत्र 

  3. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र 

  4. चालू वर्षांमध्ये, एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी नसल्याचे हमीपत्र 

  5. CAP संबंधित दस्तऐवज 

  6.  बायोमेट्रिक उपस्थितीचा पुरावा ( यूआयडीएआय च्या माध्यमातून )




राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अर्जप्रक्रिया 

mahadbt scholorship scheme 2023

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. 




सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी) mahadbt scholorship scheme 2023 या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.



mahadbt scholorship scheme 2023

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.