राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेनुसार मिळणार शेतीसाठी उपयुक्त अवजारे जाणून घ्या संपूर्ण माहिती / rajya krushi yantrikiaran yojna in marathi

rajya-krushi-yantrikikaran-yojna-in-marathi


rajya krushi yantrikikaran yojna in marathi : महाराष्ट्र राज्यसरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नेहमीच विविध योजना राबवित असते अश्याप्रकारच्या योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न करत असते. अश्याच एका महत्वपूर्ण योजनेपैकी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना ही एक योजना आहे.


कृषी यांत्रिकीकरण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत मुख्य उपकरणांच्या खरेदीवर 80% अनुदान दिले जाते. अनेक शेतकरी हे महागाईमुळे कृषी उपकरणे खरेदी करू शकत नाहीत त्यामुळे शेतीतील कामे ते वेळेमध्ये पूर्ण करू शकत नाहीत आणि याचा परिणाम त्यांच्या उत्पादनावर होतो आणि त्याचे खूप नुकसान होते. 


 या लेखामध्ये आपण या योजनेची परिपूर्ण माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता, लाभार्थी कोण कोण असणार आहेत तसेच या योजनेच्या माध्यमातून मिळणारी उपकरणे कोण कोणती असणार आहेत अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्हालापण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा. 


राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश 

rajya krushi yantrikikaran yojna in marathi
  • शेतीमधील उर्जेचा वापर वाढविणे
  • शेतकऱ्यांचे कमी श्रमात उत्पादन वाढविणे
  • शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे
  • शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविणे
  • शेतीसाठी मजुरांची असणारी कमतरता कमी करणे
  • शेतकऱ्यांचे कृषी उपकरणांच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान टाळणे
  • जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी उपकरणांचा पुरवठा करणे
  • अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना धोरण 


कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे.



राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अनुदान


राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना खालील प्रमाणे अनुदान मिळणार आहे.

  • महिला शेतकरी, अल्प व अत्यल्प भूधारक आणि अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळणार आहे तसेच इतर शेतकऱ्यांना 40% अनुदान मिळणार आहे.
  • मात्र राईस मिल, दाल मिल , पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्वरायजर/पॉलीशर च्या बाबतीतअल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा याना 60 टक्के व इतर लाभार्थी याना 50 टक्के अनुदान.
  • अनुदानासाठी GST रक्कम गृहीत धरण्यात येणार नाही.
  • तशाच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी 40%, 24 लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे.


  राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने नुसार विविध आवजारसाठी मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम 

  • अल्प / अत्यल्प / महिला / अज / अजा / (50%)
ट्रॅक्टर (08-70 पिटीओ एचपी ) :- 1,25000 

पॉवर टिलर 
(8 बीएच पेक्षा कमी ) :- 65,000 
(8 बीएच पी व त्यापेक्षा जास्त ):- 85,000 

स्वयंचलित अवजारे 
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) :– 1,75,000

रिपर कम बाइन्डर (4 व्हील) :– 2,50,000

रिपर :- 75,000

पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड  ) :- 25,000

पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) :– 35,000
पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) :– 63,000


ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे

रोटाव्हेटर 5 फुट – 42000/-

रोटाव्हेटर 6 फुट – 44800/-

थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) – 100000

थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) – 250000

पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 20000

रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र) - 35000

कल्टीव्हेटर – 50000

पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 70000/-

पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 89500/-

पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 40000/-

नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 50000/-

ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट) - 125000/-

विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 75000

कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर – 100000/-

  • इतर लाभार्थी (40%)
ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) :- 100000

पॉवर टिलर

8 बीएच पी पेक्षा कमी :- 50,000

8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त :- 70,000


स्वयंचलित अवजारे

रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 140000/-

रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 200000/-

रीपर – 60000/-

पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड  ) – 20000

पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) – 30000

पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 50000



ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे

रोटाव्हेटर 5 फुट – 34000

रोटाव्हेटर 6 फुट – 35800

थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) - 80000

थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) – 200000

पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 16000

रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र) - 30000/-

कल्टीव्हेटर – 40000/-

पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 56000

पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 71600/-

पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 32000/-

नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 40000

ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट) - 100000/-

विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 60000/-

कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर – 80000/-



काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी अनुदान

  • अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा



यंत्र

अनुदान

मिनी दाल मिल-

60 टक्के,150000/-

मिनी राईस मिल-

60 टक्के,240000/- 

पैकिंग मशीन-

60 टक्के 300000/-

सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर-

60 टक्के, 60000/-

सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर-

50टक्के,

100000/

  • इतर लाभार्थी

यंत्र

अनुदान

मिनी दाल मिल-

50 टक्के, 125000/- 

मिनी राईस मिल-

50 टक्के,200000/- 

पैकिंग मशीन-

50 टक्के,240000/-

सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर-

50 टक्के,50000/-

सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर-

40 टक्के,80000/-



राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना पात्रता 

rajya krushi yantrikikaran yojna in marathi

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत, पण या योजनेसाठी शासनाने काही नियम बनवले आहेत ते खालील प्रमाणे आहेत. 

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  • शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  • शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  • फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  • कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
  • कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक

उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील



राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा
  • ८ अ दाखला
  • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  • जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  • स्वयं घोषणापत्र
  • पूर्वसंमती पत्र

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अर्जप्रक्रिया 


या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा



राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना लाभार्थी निवड

संगणकीय प्रणालीद्वारे सर्व योजनांसाठी एकत्रित ऑनलाईन सोडत काढली जाते. निवड झालेल्या शेतकरी यांना त्यांच्या मोबाईल वर एसएमएस येईल.  ज्या लाभार्थी यांची निवड झाली नाही आणि ते प्रतिक्षा यादीत आहेत अशा लाभार्थी यांना पुढील वर्षी त्याच बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबिटी पोर्टल वर मागिल वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा. त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.


शेतकरी यांच्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते व पात्र ठरलेल्या शेतकरी यांना पुर्व सम्मती आदेश ऑनलाईन देण्यात येतो व त्याबाबतचा एसएमएस शेतकरी यांच्या मोबाईल वर पाठवला जातो. शेतकरी यांना पुर्वसंमती आदेश महाडीबिटी पोर्टल वरील त्यांच्या लॉगइन मध्ये उपलब्ध होइल. पुर्वसंमती आदेश पाहण्यासाठी त्यांचा युजरआयडी व पासवर्ड टाकुन पाहू शकतील.


त्याच प्रमाणे अर्जाच्या विविध टप्प्यांवर लाभार्थी शेतकरी यांना एसएमएस येईल.



राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अनुदान मिळण्याची प्रक्रिया 

  • यंत्र/औजारे खरेदी करताना स्वत:च्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने/धनादेश/धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास रक्कम देणे बंधनकारक आहे.
  • खरेदी केल्यानंतर शेतकरी यांनी देयकाची प्रत (जीएसटी क्रमांका सह) महाडीबिटी पोर्टल वर अपलोड करावी.
  • त्यानंतर शेतास प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अधिकारी मोका तपासणी करतील व देय अनुदानाची शिफारस करण्यात येईल.
  • पात्र ठरलेल्या शेतकरी यांना देय अनुदान लाभार्थीचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.

सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेची rajya krushi yantrikikaran yojna in marathi संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.



                                      rajya krushi yantrikikaran yojna in marathi 






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.