विहीर योजनेसाठी अर्ज सुरू पहा सविस्तर माहिती / Birsa Munda Krushi Kranti yojana

Birsa-Munda-Krushi-Kranti-yojana


नमस्कार शेतकरी मित्रहो, आज आपण या लेखामध्ये बिरसा  मुंडा कृषी क्रांती योजनेची परिपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्हालापण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. 


महाराष्ट्र राज्यसरकार हे  शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करने हे ध्येय समोर ठेवून नेहमीच विविध कल्याणकारी योजना राबवित असते हेच ध्येय समोर ठेवून कृषी विभागाच्या माध्यमातून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार हे शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी विविध माध्यमांची उपलब्धता करून देणार आहे जसे नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार अश्याप्रकारच्या  माध्यमांसाठी अनूदान उपलब्ध करून देणार आहे. 


शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाणी हे खूप आवश्यक असते कित्येक शेतकरी पाण्याच्या अभावामुळे शेतीमध्ये चांगले उत्पादन काढू शकत नाहीत आणि त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती खराब होते या सर्व बाबींचा विचार करून, अश्या आदिवासी जमातीतील  शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी ही योजना राज्यशासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. 


बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुदान:

Birsa munda krushi kranti yojana anudan 



बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेनुसार खालील बाबींवर अनुदान मिळणार आहे. 


अ/क्र

    मिळणारी साधने 

      अनुदान 

1 )

  नवीन विहीर 

    2,50,000 

2)

  जुनी विहीर दुरुस्ती 

    50,000 

3)

  इनवेल बोअरिंग 

    20,000   

4)

  पंप संच 

    20,000

5)

  वीज जोडणी

    10,000 

6)

  शेततळे प्लास्टीक अस्तरीकरणासाठी  

    1,00,000  

7)

  ठिंबक सिंचन 

    50,000 

8)

  तुषार सिंचन 

    25,000 

9)

  पीव्हीसी पाईप 

    30,000 

10)

  पारसबाग 

      500 



महत्वाच्या बाबी - 



  • बिरसा मुंडा कृषी योजनेसाठी अनुसूचीत जातीतीलच शेतकरी पात्र असणार आहेत त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी अर्ज करू नये. 
  • राज्यातील मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकरी वगळता सर्व जिल्ह्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पात्रता:

Birsa Munda Krushi Kranti Yojana Eligibility 



  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर (नवीन विहीरीसाठी किमान 0.40 हेक्टर ) असणे बंधनकारक आहे. 
  • अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. 
  • अर्जदार शेतकऱ्याकडे जातीचा वैध दाखला असणे बंधनकारक आहे. 
  • जमिनीचा 7/12 व 8-अ असणे बंधनकारक आहे . 
  • शेतकऱ्याचे वार्षीक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा कमी असावे. 
  • चालू वर्षाचा उत्पन्न दाखला सादर करणे बंधनकारक आहे. 
  • एखाद्या शेतकऱ्याने जर या योजनेचा या योजनेचा लाभ घेतला असेल तर पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला किंवा त्याच्या परिवारातील कोणत्याही सदस्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 


बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना कागदपत्रे:

Birsa Munda Krushi Krantee Yojana Documents 


या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ही प्रत्येक साधनांसाठी वेगवेगळी आहेत तरी तुम्ही खालील सर्व लेख अवश्य वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व साधनांच्या कागदपत्रांच्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळेल. 


नवीन विहीर 


  1. गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र. 
  2. जातीचा वैध दाखला. 
  3. 7/12 व 8-अ उतारा. 
  4. अर्जदार शेतकऱ्याचे प्रतिज्ञापत्र (100/500 रु. च्या स्टॅम्पवर ). 
  5. अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र. 
  6.  भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्ध असल्याचा  दाखला.
  7. कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र. 
  8. ज्या ठिकाणी विहीर घ्यायची असेल त्या ठिकाणाचा फोटो (महत्वाच्या खुणासाहित व अर्जदारसाहित ). 
  9. या योजनेचा पूर्वी लाभ घेतला नसल्याचा प्रमाणपत्र. 
  10. ग्रामसभेचा ठराव. 
  11. उत्पन्नाचा दाखला. 
  12. तलाठी यांचेकडील दाखला - सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.

जुनी विहीर दुरुस्ती / इनवेल बोअरिंग याबाबीकरीता:



  • अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र. 
  • मागील वर्षांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र / दारिद्रय रेषेखाली असल्यास प्रमाणपत्र / असल्यास बीपीएल कार्ड. 
  • जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
  • ग्रामसभेतील ठराव. 
  • तलाठी यांचेकडील दाखला - एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
  • लाभार्थीचे बंधपत्र (१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर). 
  •  इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील रिपोर्ट. 
  •  ज्या विहीरीचे काम करून घ्यायचे आहे, त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो विशिष्ट खुणा सहित लाभार्थ्यासह. 
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र. 
  • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र. 
  • कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र.

शेततळ्यास अस्तरीकरण, वीज जोडणी, ठिंबक सिंचन किंवा तुषार सिंचन साठी  आवश्यक कागदपत्रे:


1. अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र.
2 . तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. १,५०,०००/- पर्यंत ) किंवा दारिद्रय
3 . रेषेखालीअसलेबाबतचे प्रमाणपत्र किंवा BPL कार्ड (लागू असलेस).
4. ७/१२ दाखला व ८-अ उतारा.
5. तलाठी यांचेकडील एकूण क्षेत्राबाबतचा दाखला. (०.२० ते ६ हेक्टर मर्यादेत असणार आहे ).
6. शेततळे अस्तरीकरण पुर्ण झाल्याचे हमीपत्र (१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर)
7 . विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत 8.मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन     घ्यावे.
9. ग्रामसभेची शिफारस किंवा मंजूरी
10. काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो विशिष्ट खुणा सहित लाभार्थ्यासह.
11. या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र गरजेचे आहे.


बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अर्जप्रक्रिया:


या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी mahadbt पोर्टल ला भेट द्या. https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login 



सारांश: 


आशा करतो की हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या बाबतीत संपूर्ण माहिती ( या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, मिळणारे अनुदान,लागणारी पात्रता, मिळणारी साधने ) मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.





                                                                  Birsa Munda Krushi Kranti yojana 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.