प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना / Pradhanmantri krishi sinchai yojana 2024

Pradhanmantri krishi sinchai yojana 2024


Pradhanmantri krishi sinchai yojana 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, आज आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या बाबतीत परिपूर्ण माहिती पाहणार आहोत.  या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा, कोणकोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील तसेच  या योजनेच्या माध्यमातून जलसिंचनासाठी कोण कोणती साधने मिळणार आहेत याबाबतीत संपूर्ण माहिती आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत  वाचा . 


प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवणे या उद्देशाने सन 2015 - 16 पासून सूक्ष्म सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या केंद्र शासनाच्या  महत्त्वकांक्षी योजनेमध्ये समाविष्ट केली आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेचे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी करताना केंद्र व राज्य प्रमाण 60:40  करण्यात आलेले आहे.  प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये प्रति थेंब अधिक पीक अंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना 2015-16 पासून राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे. 


ठिंबक सिंचन


Pradhanmantri krishi sinchai yojana 2024


पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंब थेंब किंवा  बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजेच ठिंबक सिंचन होय. या पद्धतीत जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो त्यापेक्षा कमी वेगाने विकास पाणी दिले जाते मुख्यत्वे करून पाणी थेंबा थेंबाने अथवा सूक्ष्म झाल्याने दिले जाते. यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये देखील शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात. ठिंबक  सिंचनात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या 60 टक्के ठिंबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.

ठिबक सिंचनाचे फायदे 


  • पाणी हे जमिनीला न देता मुळास  दिले जाते.
  •  वापसा स्थिती कायम राहत असल्याने पिकाची वाढ जोमदार आणि सतत होते.
  •  पिकाला रोजच एका दिवसाआड अथवा गरजेनुसार पाणी दिले जाते.
  •  मुळ्याच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती, हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो.
  •  पाणी कमीत कमी वेगाने दिले जाते. त्यामुळे ते मुळाच्या सभोवती जिरते. ठिबक सिंचनाच्या या गुणामुळे हे चांगली जोराने वाढतात व दर्जेदार पीक उत्पादन मिळते. 


तुषार सिंचन



Pradhanmantri krishi sinchai yojana 2024


पाईपला जोडलेल्या बारीक वेज असलेल्या तोटेद्वारे (स्प्रिंकलर नोझल) पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे  पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाण्याची पद्धत म्हणजे तुषार सिंचन  होय. जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम  वर्तुळाकाररित्या फिरवण्याची सोय असते. 


तुषार सिंचनाचे फायदे 

  • तुषार पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही. 
  •  प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते. 
  • तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते. 
  •  पाण्याची 25 ते 35 टक्के बचत होते पाणी सर्व ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे देता येते. 
  •  पाण्याचा प्रवाह कमी असताना सुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते. 
  • पावसासारखे पाणी पिकावर पडते त्यामुळे काही-किडी रोग धुवून जातात. 
  • द्रवरूप रासायनिक खते तुषार सिंचनाद्वारे देता  येतात. खते पिकाच्या मुळाशी पडतात,त्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन बचत होते. 



प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश 

Pradhanmantri krishi sinchai yojana purpose

 

  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे. 
  • जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे. 
  • कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वृद्धी करणे. 
  • समन्वित पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे. 
  • आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी व  फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करणे, त्याची वृद्धी व प्रसार करणे. 
  •  कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण करणे. 


प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अनुदान 

Pradhan Mantri Krishi sinchai yojana anudan 



केंद्र शासनाने  दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर योजनेमध्ये लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान खालील प्रमाणे आहे.  


  1. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी - 55 %

  2. इतर शेतकरी - 45 %


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पात्रता

Pradhan mantri krishi sinchai yojana eligibility  



  • अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे. 
  •  अर्जदार शेतकऱ्याकडे 7/12  प्रमाणपत्र आणि 8-अ  प्रमाणपत्र असणे जरुरी आहे. 
  • अर्जदार शेतकरी जर एससी, एसटी जाती वर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र असणे जरुरी आहे.
  • जर अर्जदार शेतकऱ्यांनी 2016 - 17 च्या आधी या योजनेनुसार कोणत्याही सर्वे नंबर साठी  लाभ घेतला असेल तर त्याला येणाऱ्या 10 वर्षापर्यंत त्या सर्वे नंबर साठी लाभ घेता येऊ शकणार नाही आणि जर लाभार्थी शेतकऱ्यांनी 2017 - 18  च्या नंतर या योजनेअंतर्गत कोणत्याही सर्वे नंबर साठी लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला येणाऱ्या सात वर्षापर्यंत त्या सर्वे नंबर वर लाभ घेता येऊ शकणार नाही. 
  • अर्जदार शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे.  त्यासाठी शेतकऱ्यांना वीज बिल ची ताजी प्रत सादर करावी लागेल. 
  • सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी. 
  •  अर्जदार शेतकऱ्यांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित लाभ देण्यात येईल. 
  • शेतकऱ्याला पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून  सूक्ष्म - सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व - मंजुरी मिळाल्यानंतर 30  दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात. 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कागदपत्रे 

Pradhan mantri krishi sinchai yojana documents 


  • 7/12 प्रमाणपत्र
  • 8-अ प्रमाणपत्र
  •  विज बिल
  •  खरेदी केलेल्या संचाचे  बिल
  •  पूर्वसंमती पत्र


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान मर्यादा

Pradhanmantri krushi sinchai yojana limitations 


  • अवर्षण प्रवण क्षेत्रामधीलअल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी - 60 %
  • अवर्षण प्रवण क्षेत्रामधील सर्वसाधारण भूधारक शेतकरी - 45 %
  • अवर्षण प्रवण क्षेत्राच्या बाहेरील अल्प व अल्पभूधारक शेतकरी - 45 %
  • अवर्षण प्रवण क्षेत्राच्या बाहेरील सर्वसाधारण भूधारक शेतकरी - 35 %

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना फायदे

Pradhanmantri krushi sinchai yojana benefits


  1.  या योजनेमुळे कमीत कमी पाण्याची सुविधा असणारे शेतकरी देखील चांगल्या प्रकारे शेती करू शकतील.
  2. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठीच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सोपे होईल.
  3. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
  4. या योजनेमुळे प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचे सरकारचे ध्येय साध्य होईल.
  5. कृषी उत्पादन वाढेल ज्यामुळे अन्नधान्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवता येईल आणि त्यामुळे महागाई सुद्धा नियंत्रण ठेवता येईल.
  6.  कृषी उत्पादन वाढले म्हणजे गरजेच्या वेळी साठवून ठेवता येईल आणि परदेशात निर्यातही करता येईल. येणाऱ्या काळामध्ये विदेशी गुंतवणुकीमध्ये देखील वाढ होईल.
  7. कृषी उत्पादनामध्ये वाढ झाल्यामुळे कच्च्या मालासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या इतर उद्योगांमध्ये देखील वाढ होईल.
  8. जेव्हा देशाचे कृषि उत्पादन प्रत्येक व्यक्तीसाठी पुरेशी असेल तेव्हा अन्नधान्य बाहेरून आयात करण्याची गरज पडणार नाही आणि त्यामुळे आयातीसाठी वेगळे ठेवलेले पैसे पायाभूत सुविधांचा विकास, आंतरराष्ट्रीय कर्जाची परतफेड इत्यादी इतर क्षेत्रांमध्ये वापरले जाईल. 

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अर्जप्रक्रिया  

Pradhanmantri krushi sinchai yojana arjprakriya 



या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही घरी बसून ऑनलाइन मोबाइल किंवा लॅपटॉप च्या माध्यमातून अर्ज करू शकता . अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ल भेट देण्यासाठी  येथे क्लिक करा


सारांश 


आशा करतो की हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या बाबतीत संपूर्ण माहिती ( या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, मिळणारे अनुदान,लागणारी पात्रता, मिळणारी उपकरणे ) मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.




                                  Pradhanmantri krishi sinchai yojana 2024

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.