आभा हेल्थ कार्ड बनवा फक्त 2 मिनिटात तुमच्या मोबाइल वर / abhaa card registration in marathi

abhaa-card-registration-in-marathi


Abhaa Card Registration In Marathi  नमस्कार मित्रहो  आज या लेखामध्ये आपण केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या  आभा हेल्थ कार्ड या abhaa card registation in marathi योजनेच्या बाबतीत  संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आभा कार्ड काय आहे,  हे कार्ड बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, या  कार्डामुळे आपल्याला कोणकोणते लाभ मिळणार आहेत, या कार्डसाठी असणारी पात्रता काय राहणार आहे, हे कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे अशा प्रकारची संपूर्ण  माहिती आपण आज या लेखामध्ये पाहणार आहोत. 

मित्रहो तुम्हाला पण या कार्डाचा लाभ मिळवायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा. 


“आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थाने नागरिकांच्या आरोग्याची कुंडलीच आहे, “असं म्हणत हे कार्ड बनवून घेण्याच आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे. 


“या कार्डसोबत रुग्णांच्या आरोग्याबाबतीत संपूर्ण माहिती नोंदणविण्यात येईल. या कार्डाच्या मदतीने डॉक्टर तुमच्या संपूर्ण नोंदी पाहू शकणार आहेत. म्हणजेच या कार्डदधारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास खूप सोप्या पद्धतीने पाहता येणार आहे,” अस मुख्यमंत्री म्हणाले. चला तर मित्रहो पाहुयात आभा हेल्थ कार्ड च्या बाबतीत संपूर्ण माहीती. 


आभा हेल्थ कार्ड काय आहे ?

abhaa card registration in marathi 

आभा हेल्थ कार्ड हे आधार कार्ड सारखेच एक कार्ड असते. आभा म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट नंबर होय, हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. ज्यामध्ये आपल्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाणार आहे. या कार्डवर पण आधार कार्ड वर जसे नंबर असतात तसे 14 अंकी नंबर असतात आणि याच नंबरांचा उपयोग करून डॉक्टर रुग्णांचा सगळा मेडिकल इतिहास पाहू शकणार आहेत. 


जसेकी कोणत्या रुग्णाला कोणकोणत्या आजारांवर इलाज झाला आहे ? तो कधी व कोण कोणत्या रुग्णालयात झालाय ? कोण कोणत्या टेस्ट करण्यात आल्या होत्या ? कोण कोणती औषधी देण्यात आली ? रुग्णाला आरोग्याशी संबंधित कोणकोणत्या समस्या आहेत ? तो रुग्ण कोणत्या आरोग्यविषयक योजणांशी जोडला गेला आहे ? अश्याप्रकारची संपूर्ण माहिती कार्डामध्ये डिजिटल पद्धतीने साठवली जाणार आहे. 


या कार्डावर असणाऱ्या युनिक आयडीचा उपयोग करून डॉक्टर रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित माहिती पाहू शकणार आहेत. पण, त्यासाठी रुग्णाची अनुमती अनिवार्य असणार आहे. 


तसेच जेंव्हा आपल्याला वाटले तेव्हा आपण हे आभा कार्ड म्हणजे आपली आरोग्यविषयक माहीती डिलीट पण करू शकणार आहोत. 


या कार्डाचे आपल्याला भरपूर फायदे होणार आहेत जसेकी पूर्वी आपल्याला रुग्णालयात जात असताना अगोदरच्या डॉक्टर कडे इलाज केलेली चिठ्ठी, गोळ्यांची कागदे सोबत न्यावी लागत होती abhaa card registration in marathi पण आता आपणास  काहीपण घेऊन जायची गरज नाही केवळ आभा कार्डाचा नंबर सांगितल्यानंतर डॉक्टर आपला आरोग्यविषयक इतिहास पाहू शकणार आहेत. म्हणजे आपल्याकडे अगोदरच्या टेस्टचे रिपोर्ट जरी नसले तरी त्या सर्व टेस्ट परत करायची गरज भासणार नाही. ज्यामुळे आपल्या पैशाची आणि वेळेची बचत होणार आहे. 


 आभा हेल्थ कार्ड मुळे होणारा लाभ


  • आपली आरोग्य संबंधित संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपामध्ये साठवली जाणार आहे. 
  • आपल्या आरोग्य संबंधित संपूर्ण माहिती केवळ एका क्लिकवर आपण पाहू शकणार आहोत. 
  • प्रत्येक वेळेस रुग्णालयात जाताना पूर्वीचा रिपोर्ट कार्ड सोबत घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. 
  • पूर्वीचा वैद्यकीय अहवाल व प्रयोग शाळेमधील अहवाल आपण केव्हा पण पाहू शकणार आहोत. 
  • वैद्यकीय विम्याचा दावा करण्यासाठी सोपे जाणार आहे कारण आभा कार्ड हे विमा कंपनीशी जोडलेले असणार आहे. 
  • ऑनलाइन उपचार, वैयक्तिक आरोग्य माहिती रेकॉर्ड, ई फार्मसी अशा प्रकारच्या सुविधा आपण या कार्डाच्या माध्यमातून मिळवू शकणार आहोत. 

आभा हेल्थ कार्ड साठी आवश्यक असणारी कागदपत्रे 


  • आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
  •  मोबाईल नंबर ( मोबाईल नंबर हा आधारशी लिंक असायला हवा, आधार कार्डच्या माध्यमातून आभा कार्ड काढत असाल तर )
  • पासपोर्ट साईज फोटो
  •  जन्म नोंदणी दाखला

आभा कार्ड कसे बनवावे ?


आभा हेल्थ कार्ड  हे आपण सार्वजनिक  रुग्णालय, खाजगी रुग्णालय, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी जाऊन बनवू शकतो. किंवा आपण घरी बसून ऑनलाईन पद्धतीने देखील आभा  कार्ड बनवू शकतो. 


ऑनलाइन पद्धतीने आभा कार्ड कसे बनवावे ?


ऑनलाइन पद्धतीने आभा कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या ब्राऊजर मध्ये शासनाची अधिकृत वेबसाइट ओपन करा. ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा


ओपन केल्यानंतर खालील पेज ओपन होईल 


abhaa-card-registration-in-marathi

 

वरील पेज वर बॉक्स मध्ये असणाऱ्या create ABHA number वर क्लिक करा मग पुढील पेज ओपन होईल. 

 

abhaa-card-registration-in-marathi


वरील पेज वर आधार कार्ड आणि ड्रायविंग लायसेंस हे दोन पर्याय दिसत आहेत म्हणजेच आभा कार्ड आपण आधार कार्ड आणि ड्रायविंग लायसेंस च्या माध्यमातून बनवू शकतो तुम्हाला जो पर्याय निवडायचा तो निवडा, आधार कार्ड च्या माध्यमातून कार्ड बनवायची प्रक्रियेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. 


आधार कार्ड च्या माध्यमातून आभा कार्ड बनवण्यासाठी डाव्या बाजूला असणाऱ्या आधार कार्ड या पर्यायावर क्लिक करा. 


मग पुढील पेज ओपन होईल. 


abhaa-card-registration-in-marathi


अश्या प्रकारचा पेज ओपन होईल. 


वरील पेज वर आधार कार्ड नंबर टाका मग खालील बॉक्स वर क्लिक करून सर्व नियम आणि अटी स्वीकार करा आणि त्यानंतर कॅपच्चा कोड टाकून नेक्स्ट बटनावर क्लिक करा तुमच्या आधार कार्ड ला रजिस्टर असणाऱ्या मोबाइल नंबर वर OTP जाईल  मग पुढील पेज ओपन होईल. 


  abhaa-card-registration-in-marathi


आलेला OTP एंटर करा आणि त्यानंतर मोबाइल नंबर टाकून नेक्स्ट बटणावर क्लिक करा. 


abhaa-card-registration-in-marathi


अश्याप्रकारचा पेज ओपन होईल वर दिसणाऱ्या कंटिन्यू वर क्लिक करा 


abhaa-card-registration-in-marathi


वरील पेज सारखा इंटरफेस ओपन होईल वर दिसणाऱ्या बॉक्स मध्ये क्लिक करून तुम्हाला जो आभा आयडी बनवायचा तो एंटर करा आणि उजव्या बाजूला असणाऱ्या क्रिएट आभा वर क्लिक करा . 


मग पुढील पेज ओपन होईल आणि तुमचा आभा कार्ड बनून तयार होईल आणि त्या पेज वर डाउनलोड आभा कार्ड आणि प्रिंट आभा कार्ड असे दोन पर्याय येतील त्यापैकी डाउनलोड आभा कार्ड या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या डिवाइस मध्ये आभा कार्ड अगदी सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकता.



सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला आभा कार्डा abhaa card registration in marathi बद्दलची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.






abhaa card registration in marathi

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.