आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार शेतीसाठी पाणी सरकार देणार विहीरीसाठी अनुदान / babasaheb aambedkar krushi swavlamban yojana 2024

babasaheb-aambedkar-krushi-swavlamban-yojana-2024


babasaheb aambedkar krushi swavlamban yojana 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, आज आपण या लेखामध्ये डॉ बाबासहेब आंबेडकर कृषी स्वावललंबन योजनेच्या बाबतीत संपूर्ण माहिती पाहणार आहोत ही योजना काय आहे, या योजनेसाठी लागणारी पात्रता काय असणार आहे, या योजनेनुसार मिळणारे अनुदान किती असेल, या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत अश्याप्रकारची परिपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्हालापण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे पूर्ण लेख काळजीपूर्वक जरूर वाचा. 

शेतकऱ्यांसाठी पानी हे खूप महत्वाचे असते पाण्याच्या अभावामुळे कित्येक शेतकरी हे आर्थिकरित्या कमजोर होत आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या खासकरून  अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिकरित्या सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून सिंचनाची शाश्वत सुविधाउपलब्ध करून देण्यासाठी ही योजना  राज्यशासनाच्या कृषीविभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना विविध सिंचनाची साधने अनुदानाच्या माध्यमातून पुरवठा करणार आहे. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेनुसार मिळणारे अनुदान

babasaheb aambedkar krushi swavlamban yojana 2024


अ/क्र 

योजना 

अनुदान 

1)

नवीन विहीर 

2,50,000 

2 )

जुनी विहीर दुरुस्ती 

50,000 

3)

इनवेल बोअरिंग 

20,000 

4)

पंप संच 

20,000 

5)

वीज जोडणीसाठी मदत 

10,000 

6)

शेतळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरण 

1,00,000 

7)

ठिंबक सिंचन  

50,000 

8)

तुषार सिंचन संच 

25,000 

9)

पीव्हीसी पाईप 

30,000 

9)

परसबाग 

5000 



 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी लागणारी पात्रता

babasaheb aambedkar krushi swavlamban yojana 2024


  • अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जाती प्रवर्गातील / नवबौद्ध प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. 
  •  जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे . 
  • जमिनीचा 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक असेल. 
  • अर्जदार शेतकऱ्याचे वार्षीक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असणे बंधनकारक असणार आहे. 
  • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. 
  • अर्जदार शेतकऱ्याकडे जमीन 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत ( नवीन विहीरीसाठी किमान 0.40 हेक्टर ) असणे गरजेचे असणार आहे.


नोट

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध जातीतील शेतकाऱ्यांसाठीच राबविण्यात आली आहे. 
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, आणी कोल्हापूर ही जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. 
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ही प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळी आहेत त्यामुळे कागदपत्रांची माहिती ही काळजीपूर्वक वाचा 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना लागणारी कागदपत्रे 

babasaheb aambedkar krushi swavlamban yojana documents

A) नवीन विहीरीसाठी लागणारी कागदपत्रे 


  • तहसीलदारकडील दीड लाखापेक्षा कमी वार्षीक उत्पन्न असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र. 

  • 7/12 व 8-अ चा उतारा. 
  • अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र. 
  • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र. (100/500 च्या स्टॅम्प पेपरवर )
  • अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र. 
  • तलाठी यांचेकडील दाखला - सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
  • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा पाणी उपलब्ध असल्याचा दाखला. 
  • कृषी अधिकाऱ्याकडील क्षेत्रीय पाहणी  व शिफारस पत्र. 
  • गटविकास अधिकाऱ्याचे शिफारस पत्र. 
  •  ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
  • ग्रामसभेतील ठराव. 


B) जुनी विहीर दुरुस्ती / इनवेल बोअरिंगसाठी 


  • तहसीलदारकडील दीड लाखापेक्षा कमी वार्षीक उत्पन्न असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र. 
  • 7/12 व 8-अ चा उतारा. 
  • अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र. 
  • लाभार्थीचे बंधपत्र. (100/500 च्या स्टॅम्प पेपरवर )
  • अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र. 
  • तलाठी यांचेकडील दाखला - सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
  • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा पाणी उपलब्ध असल्याचा दाखला. 
  • कृषी अधिकाऱ्याकडील क्षेत्रीय पाहणी  व शिफारस पत्र. 
  • गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र. 
  • इनवेल बोअरिंगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेतील feasibility report.
  • ग्रामसभेतील ठराव. 
  •  ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह). 

शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / ठिंबक सिंचन / तुषार सिंचन यांसाठी 

babasaheb aambedkar krushi swavlamban yojana 2024

  • तहसीलदारकडील दीड लाखापेक्षा कमी वार्षीक उत्पन्न असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र. 
  • 7/12 व 8-अ चा उतारा. 
  • अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र. 
  • तलाठी यांचेकडील दाखला - सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
  • ग्रामसभेकडील मिळालेली शिफारस  / मंजुरी. 
  • शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर). 
  • काम सुरू करण्याच्या पूर्वीचा फोटो ( महत्त्वाच्या खुनेसह ). 
  • विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसल्याचे  हमीपत्र. 
  • प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.



 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 


या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी mahadbt पोर्टल ला भेट द्या तुम्हाला जर वेबसाइट माहीती नसेल तर या अधिकृत वेबसाइट वर तुम्ही अर्ज करू शकता. https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login 



सारांश 


आशा करतो की हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या babasaheb aambedkar krushi swavlamban yojana 2024 बाबतीत संपूर्ण माहिती ( या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, मिळणारे अनुदान,लागणारी पात्रता, मिळणारी साधने ) मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.






babasaheb aambedkar krushi swavlamban yojana 2024

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.