भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना / bhausaheb fundkar falbaag laagvad yojna

 

bhausaheb fundkar falbaag laagvad yojna


bhausaheb fundkar falbaag laagvad yojna :- नमस्कार शेतकरी मित्रहो आज या लेखामध्ये आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या बाबतीत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लागणारी पात्रता, अर्जप्रक्रिया, लागणारी कागदपत्रे तसेच या योजनेनुसार मिळणारी लाभ आणि लाभार्थी या बाबतीत संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्हाला पण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.


भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ही सन 2018 - 2019 पासून राज्यामध्ये नव्याने सुरू करण्यात आली आहे. जे लाभार्थी केंद्र शासनामार्फत राबविण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेनुसार फळबाग लागवड  बाबींचा लाभ घेऊ शकले नाहीत, त्यांना लाभ देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. सादर योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. 



 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना वैशिष्ट्य 

bhausaheb fundkar falbaag laagvad yojna

  1. या योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर झालेले अनुदान हे टप्याटप्याने देण्यात येणार आहे. 
  2. पहिल्या वर्षी 50% अनुदान देण्यात येणार आहे. 
  3. दुसऱ्या वर्षी 30% अनुदान देण्यात येणार आहे. 
  4. तिसऱ्या वर्षी 20% अनुदान देण्यात येणार आहे. 
  5. अर्जदार शेतकऱ्याला बागायती झाडांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांपैकी 90% झाडे जीवित ठेवावी लागतील हे प्रमाण कमी झाल्यास शेतकाऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जीवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे. 
  6. अर्जदार शेतकऱ्याला कोरडवाहू झाडांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांपैकी 90% झाडे जीवित ठेवावी लागतील हे प्रमाण कमी झाल्यास शेतकाऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जीवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे. 
  7. या योजनेच लाभ घेण्यासाठी कोकण विभागातील शेतकऱ्याकडे कमीत कमी 10 गुंठे तर जास्तीत जास्त 10 हेक्टर जमीनअसनारे शेतकरी पात्र ठरतील. 
  8.  या योजनेच लाभ घेण्यासाठी इतर विभागातील शेतकऱ्याकडे कमीत कमी 20 गुंठे तर जास्तीत जास्त 6 हेक्टर जमीन असनारे शेतकरी पात्र ठरतील. 
  9. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत पात्र लाभार्थांना प्रथम त्या योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे, उर्वरित क्षेत्रासाठी (वरील क्षेत्र मर्यादेच्या अधीन राहून) लाभार्थी या योजनेतून लाभ घेऊ शकतात.
  10. अल्प, अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले आहे.

 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना मिळणारे अनुदान 

bhausaheb fundkar falbaag laagvad yojna 

या योजनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन संचाच्या उभारणीसाठी 100% अनुदान देण्यात येईल.


 



 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना पात्रता 


  1.  लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य आहे.
  2.  सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले)
  3.  लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थांना देय नाही.
  4.  शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे आवश्यक आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
  5.  ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.
  6.  परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
  7.  इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.


 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना आवश्यक कागदपत्रे 

bhausaheb fundkar falbaag laagvad yojna 

  •  भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना. 
  • हमीपत्र. 
  •  संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र. 
  •  जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमातीशेतकऱ्यांसाठी). 


भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अर्जप्रक्रिया 


या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 



सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेची bhausaheb fundkar falbaag laagvad yojna संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.



bhausaheb fundkar falbaag laagvad yojna


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.