एक रुपयात पीक विमा योजना / ek rupyat pik vima yojna 2023-2024

 

ek-rupyat-pik-vima-yojna-2023-2024

एक रुपयात पीक विमा योजना :- नमस्कार शेतकरी मित्रहो आज या लेखामध्ये आपण महाराष्ट्र शासनादधारे राबविण्यात आलेल्या पीक विमा योजना ek rupyat pik vima yojna या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रहो तुम्हालापन जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे कुठेही स्कीप न करता हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा. 


राज्यातील शेतकरी हे प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत असतात आणि त्यांची सरकारकडून काहीतरी मदत असावी अशी नेहमीच अपेक्षा असते गेल्या वर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीची शासनाने कोणत्याही प्रकारे मदत न मिळाल्यामुळे भरपूर शेतकरी हे सरकार वर नाराज होते. परंतु सरकारने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय ऐकून सर्व शेतकरी हे खूप आनंदी होणार आहेत. 


राज्यातील शेतकरी हे प्रत्येक वर्षी शेतीवरील येणाऱ्या विविध नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी पिकांचा विमा उतरवीत असतात आणि हा विमा उतरविण्यासाठी त्यांना अगोदर प्रेमियम भरावे लागायचे त्यांच्या पिकाच्या क्षेत्राच्या आधारावर त्यांना प्रेमियम भरावा लागायचा परंतु त्यांना यावर्षी हा प्रेमियम भरायची गरज भासणार नाही केवळ 1 रुपये प्रेमियम भरून शेतकरी या पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे आणि जो उर्वरित प्रीमियम शेतकऱ्यांना भरायचा होता तो राज्य सरकार भरणार आहे. 


या योजणेमुळे शेतकऱ्यांना खूप मोठी मदत भेटणार आहे. ही योजना राबविण्याचा निर्णय चालू महाराष्ट्रातील सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अर्थ संकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे. सादर योजना ही दोन्ही ( खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम ) 2023 - 2023 ते 2025 -2026 या तीन वर्षासाठीच्या कालावधीमध्ये निविदा प्रक्रियेनुसार महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे.  




एक रुपयांत पीक विमा योजना मिळणारी भरपाई रक्कम योजना

( रुपयांमध्ये ) ek rupyat pik vima yojna 2023-2024




अ / क्र 

पीकांचे नाव 

मिळणारी रक्कम 

1)

कापूस 

59,600 

2)

मका 

35,598 

3)

कांदा 

81,422 

4)

सोयाबीन 

56,350 

5)

तूर 

36,800 

6)

बाजरी 

27,600 

7)

उडीद 

24,150 

8)

मूग 

24,150 

9)

खरीप ज्वारी 

31,050 




एक रुपयात पीक विमा योजना लागणारी आवश्यक कागदपत्रे 

ek rupyat pik vima yojna 2023-2024


  • आधार कार्ड 

  • सातबारा व एकूण जमिनीचा दाखला 

  • पीकपेरा स्वयंघोषणापत्र 

  • बँक पासबूक 


राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा


नोट 

एक रुपयात पीक विमा योजनेनुसार, पीक विमा हा मात्र 1 रुपायतच भरण्यात येतो जर कोणता ( CSC ) केंद्र वाला व्यक्ति अतिरिक्त पैसे घेऊन पीक विमा भरत असेल तर तत्काल तहसीलदार किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तक्रार करावी असे आवाहन कृषी अधिकारी यांनी सर्व शेतकरी मित्रांना केले आहे. 




सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला एक रुपयात पीक विमा योजना या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.



ek rupyat pik vima yojna 2023-2024


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.