मागेल त्याला विहीर योजना / Magel Tyala Vihir Yojana 2024

magel-tyala-vihir-yojana-2024

Magel Tyala Vihir Yojana :- महाराष्ट्र राज्य हे शेतीप्रधान राज्य आहे. राज्यातील बहुतांश लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, राज्यातील शेतकरी हे शेती करून आपली उपजीविका भागवत असतात परंतु 90%  शेतकरी हे पाण्याच्या अभावामुळे कोरडवाहू शेती करतात आणि कोरडवाहू शेती करण्यासाठी त्यांना खूप साऱ्या आव्हानांना सामोरे जावे लागते शेती करण्यासाठी त्यांना पाण्याची कमी भासते कारण पावसाचे पाणी हे अनियमित असते ज्यामुळे पिकाला ज्या वेळेमध्ये पाण्याची गरज असते त्या वेळेस शेतकरी पाणी पुरवठा करू शकत नाहीत कारण त्यांच्या कडे शेतीतील पिकांच्या सिंचनांसाठी पाणी उपलब्ध नसते आणि या पाण्याच्या अभावामुळे शेतीतील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आणि या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती वर होतो व शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. 


शेतकरी विहीरीच्या माध्यमातून शेतातील पिकांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता करू शकतात पण विहीर खोदण्यासाठी खूप जास्त प्रमाणात पैशाची आवश्यकता असते परंतु राज्यातील अधिकांश शेतकरी हे गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे आणि या कमतरतेमुळे ते शेतामध्ये विहीर खोदू शकत नाहीत.अशा प्रकारच्या शेती संबंधित शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व  समस्यांचा विचार करून राज्य शासनाने राज्यांमध्ये विहीर अनुदान योजना राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 


या योजनेनुसार राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील पिकांना सिंचन करण्यासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मित्रांना सिंचनासाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि या सुविधांचा फायदा घेऊन शेतकरी हे आर्थिकरित्या सक्षम व्हावेत यासाठी त्यांच्या शेतांमध्ये विहीर खोदण्यासाठी आर्थिक अनुदान उपलब्ध करून देणे हा मागेल त्याला विहीर योजनेचा मुख्य उद्देश आहे . 


मागेल त्याला विहीर योजनेचा उद्देश 

Magel Tyala Vihir Yojana Purpose

  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे. 
  • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये पिकांच्या सिंचनासाठी मुबलक प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता करून देणे. 
  • आर्थिकरित्या कमकुवत असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये विहीरीचे खोदकाम करण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज लागू नये किंवा कोणाकडून कर्ज काढण्याची गरज भासू नये. 
  • राज्यातील शेतीमध्ये येणाऱ्या नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांवर रोख आणणे. 
  • पाण्याच्या कामतरतेमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळणे. 
  • राज्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा स्त्रोत निर्माण करून देऊन त्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणे. 

मागेल त्याला विहीर योजनेचे वैशिष्ट्य 

Magel Tyala Vihir Yojana Speciality 

  • महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळविता येईल.या साठी कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाहीये. 
  •  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या ( मनरेगाच्या ) मध्यमातून सिंचन विहीरीच्या खोदकामासाठी 4 लाख रुपये इतक अनुदान देण्यात येत आहे हे या पंचायत समिती विहीर अनुदान योजना या योजणेच खूप महत्त्वाच वैशिष्ट्य आहे. 
  • या योजनेसाठी असणारी अर्जप्रक्रिया ही खूप सोप्या प्रकारची ठेवण्यात आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. 
  • शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्येकर या योजणेमुळे रोख लागू शकते. 
  • या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहीरिंच्या संख्यांची असणारी अट रद्द केली आहे ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना मागेल त्याला विहीर योजनेचा लाभ घेता येणार आहे. 
  • या योजनेनुसार मिळणारे आर्थिक सहाय्य हे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येते त्यामुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यास सरकार यशस्वी होणार आहे. 
  • मागेल त्याला विहीर अनुदान योजनेला पंचायत समिती विहीर अनुदान योजना या नावाने देखील ओळखण्यात येते. 

मागेल त्याला विहीर अनुदान योजनेचे लाभार्थी 

Magel Tyala Vihir Yojana benefiticary 

  • दारिद्र्यरेषेखाली कुटुंब.
  • अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
  • नीरधीसूचित जमाती.
  • जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी.
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे.
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी.
  • कुटूंबा मध्ये आत्महत्या झालेली आहे त्यांचे वारसदार.
  • महिला कर्ता असलेल्या कुटुंबातील महिला.
  • सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
  • इतर मागास वर्गातील शेतकरी.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती.
  • जॉब कार्ड धारक व्यक्ती.
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती.
  • अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील लाभार्थी.
  • अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती.
  • भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्ती.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी जे स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहे.

मागेल त्याला विहीर योजनेनुसार दिले जाणारे अनुदान 

Magel Tyala Vihir Yojana Subsidy 

  • या योजनेनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांमध्ये विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. 

मागेल त्याला विहीर योजनेनुसार करण्यात येणारी लाभार्थी निवड प्रक्रिया 

Magel Tyala Vihir Yojana Selection Process 

  • मागेल त्याला विहीर योजनेनुसार लाभार्थी निवड प्रक्रिया ही ग्रामसेवक यांच्यातर्फे करण्यात येते. 


या योजनेसाठी असणारी आवश्यक पात्रता 

Magel Tyala Vihir Yojana eligibility 

  • अर्ज करण्यासाठी शेतकरी ही महाराष्ट्र राज्याची मुळची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारी व्यक्ति ही शेतकरी असावी आणि त्या व्यक्तीजवळ शेतीयोग्य जमीन असणे अत्यावश्यक आहे. 
  • शेतीमध्ये पूर्वीची विहीर असेल तर ते व्यक्ति या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. 
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये स्वत:चे बँक खावे असावे आणि बँकेमधील खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असावे. 
  • अर्ज करणाऱ्या शेतकाऱ्याने या पूर्वी विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे किंवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडि या घटकांचा समावेश असणाऱ्या कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नसावा. 
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असणे जरूरी आहे. 
  • शेतामध्ये ज्याठिकाणी विहीरीचे खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणापासून 500 मीटर पर्यंत विहीर असू नये. 
  • लाभार्थी शेतक-याची जमीन विहीरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील. (यासंदर्भात शाखा अभियंता / उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी / कर्मचारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून त्यांचा अहवाल घेण्यात येईल)
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या 7/12 वर यापूर्वी विहीरीची नोंद नसली पाहिजे. 
  • दोन विहीरीमध्ये 150 मिटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दरिद्र रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येत नाही. 
  • लाभार्थी व्यक्तीकडे ऑनलाइन एकूण जमिनीचा दाखल असणे आवश्यक आहे. 
  • मागेल त्याला विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक राहील. 
  • अर्ज करणारे व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर अश्यावेळेस संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजेनचा लाभ घेऊ शकतील पण त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र हे 0.40 पेक्षा जास्त असणे जरूरी असेल. 
  • जर अर्जदार शेकऱ्याच्या जमिनीत सह हिस्सेदार असतील तर आशा परिस्थितीत अर्जदारला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडावे लागेल. 

विहीर अनुदान योजनेनुसार विहीर कुठे खोदावी याबाबतची माहिती 


  • नदी आणि नाल्या जवळ असणाऱ्या उथळ गाळाच्या भागात.
  • सखल जमिनीच्या भागात जेथे किमान 30 से. मी. पर्यंत मातीचा ठर व किमान 5 मित्र खिळी पर्यंत मुरूम ( झिजलेला खडक ) आढळतो. 
  • नाल्याच्या तीरावर जेथे उंचवटा आहे तेथे, पण सदर उंचावर चोपण किंवा चिकणी माती नसावी. 
  • घनदाट व गर्द पाने असणाऱ्या झाडांच्या भागात. 
  • नदी नाल्याचे जून प्रवाह पात्र जेथे आता नदी पत्र नसतांना देखील वाळू, रेती व गरगोट्या ठर दिसून येते. 
  • गोलाकार वळणाच्या आतील नदीचे / नाल्याचे भूभाग. 
  • अत्यंत दमट वातावरण असणाऱ्या जागेत. 

रोजगार हमी योजना - सिंचन विहीर 2024 नुसार अर्ज करताना लागणारी कागदपत्रे 

Magel Tyala Vihir Yojana Important Documents 

  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • रहिवाशी दाखला 
  • मोबाइल नंबर 
  • ई - मेल आयडी 
  • रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड 
  • उत्पन्नाचा दाखला 
  • बँक खात्याचा तपशील 
  • जमिनीचे कागदपत्रे 7/ 12 व 8 अ 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा 
  • सामुदायिक विहीर असल्यास सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व अर्जदारांमधील कारारपत्र 

मागेल त्याला विहीर योजनेसाठी असणारी अर्जप्रक्रिया 

Magel Tyala Vihir Yojana Application Procedure 

या योजनेसाठी अर्जदार व्यक्ती हे ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही माध्यमातून अर्ज करू शकतील. 


ऑफलाइन अर्ज करण्यासाठी असणारी प्रक्रिया 


अर्ज करण्यासाठी सदर शेतकऱ्याला सर्व प्रथम आपल्या ग्राम पंचायत कार्यालयामध्ये जावे लागेल आणि ग्राम सेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अथवा जिल्हा कार्यालयामध्ये कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक अशी कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल. 


अश्याप्रकारे ऑफलाइन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. 


ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी असणारी प्रक्रिया 


  • अर्जदार शेतकऱ्याला विहीर अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. 
  • होम पेज वर मागेल त्याला विहीर योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल 
  • तुम्हाला या योजनेचा अर्ज दिसेल त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या व सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड कर आणि सबमिट करून टाका 

अश्याप्रकारे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने या योजनेसाठी कर्ज करू शकता. 


 

सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला मागेल त्याला विहीर योजना Magel Tyala Vihir Yojana 2024 या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.

 





magel tyala vihir yojana 2024


  


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.