स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना / mahadbt scholorship yojana for army children's

mahadbt-scholorship-yojana-for-army-childrens


mahadbt scholorship yojana for army childrens :- नमस्कार विद्यार्थी मित्रहो आज या लेखामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, लागणारी पात्रता, मिळणारी शिष्यवृत्ती आणि असणारी अर्जप्रक्रिया अशी संपर्ण माहिती पाहणार आहोत. 


मित्रहो तुम्हाला पण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य वाचा . 


ही योजना महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालय विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्थेत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर शिक्षण घेणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलतींचा लाभ देण्यात येतो. 


स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना उद्देश 

 mahadbt scholorship yojana for army childrens 

  • विद्याथ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • विद्यार्थ्यांच्या मनात शक्षणाची रुची निर्माण करणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्तता करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनविणे.
  • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे.
  • कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये.
  • पैशाअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची गरज भासू नये.


स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना वैशिष्ट्य

 mahadbt scholorship yojana for army childrens 

  •  या योजनेमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनतील त्यांना पैशासाठी कोणावर ही अवलंबून राहायची गरज राहणार नाही. 
  • भरपूर विद्यार्थी ही आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत असतात अश्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. 
  • ही योजना महाराष्ट्र  शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालय विभागाकडून राबविण्यात आली आहे.
  • या योजनेनुसार मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.
  • या योजनेसाठी असणारी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन व सोपी करण्यात आली आहे ज्यामुळे अर्जदार विद्यार्थी ही घरी बसून मोबाईल आणि लॅपटॉप च्या सहाय्याने अर्ज करून शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू शकतील ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्हीपण बचत होतील. 
  • या योजनेचा लाभ मुलगा आणि मुलगी दोघेपण घेऊ शकणार आहेत.



स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना मिळणारे लाभ 


दि 13/09/1994 घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना खालील प्रमाणे  आर्थिक सहाय्य देण्यात येते. 


  • प्रवेश शुल्क - 100 टक्के 

  • सत्र शुल्क - 100 टक्के 

  • ग्रंथालय शुल्क - 100 टक्के 

  • प्रयोगशाळा शुल्क - 100 टक्के 

  • शिक्षण शुल्क - लाभार्थी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयांडून घेतली जाणार नाही. तसेच संबंधित महाविद्यालयास सदरची रक्कम देण्यात येत नाही. ( सदर शिष्यवृत्तीसाठी केवळ शासकीय, अनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थीच पात्र असणार आहेत. )

  • शिष्यवृत्ती रक्कम -

                   अ) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम ( अभियांत्रिकी अभ्यासक्रम वगळून ) - ५० रु. वार्षिक 
                   ब) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम ( अभियांत्रिकी अभ्यासक्रम ) - ६० रु. वार्षिक 
                 
                  ७. पुस्तके व इतर खर्च - 

                    अ) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम ( अभियांत्रिकी अभ्यासक्रम वगळून ) - २०० रु. वार्षिक 
                     ब) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम ( अभियांत्रिकी अभ्यासक्रम वगळून ) - ४०० रु. वार्षिक 

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना लागणारी पात्रता  


  • अर्जदार विद्यार्थी ही महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे बंधनकारक असेल. 
  • अर्जदार स्वातंत्र्य सैनिकांचा मूल  असणे आवश्यक आहे.
  • स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना म्हणजेच स्वातंत्र्य सैनिकांचे पत्नी, मुले (दत्तक आणि सावत्र ) आणि नातवंड ( मृत्यू पावलेल्या मुलांची मुले ) या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.   
  • या योजनेचा लाभ राज्यातील शासकीय / अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमास  प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शिकत असणारे महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. 

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना नूतनीकरण प्रक्रिया 



या सवलती समाधानकारक प्रगती, चांगली वर्तणूक व नियमित उपस्थिती असल्यास विहित अभ्यासक्रम संपेपर्यत चालू राहतील.
नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.




स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना लागणारी कागदपत्रे 


  • रहिवाशी प्रमाणपत्र 
  • स्वातंत्र्य सैनिकाला ज्याठिकाणी कारावासाची शिक्षा झालेली आहे त्या जिल्ह्यामधील दंडाधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. 
  • मागच्या वर्षीची गुणपत्रिका 
  • बोनफाईड प्रमाणपत्र 

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजनेसाठी असणारी अर्जप्रक्रिया


या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना mahadbt scholorship yojana for army childrens या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.





mahadbt scholorship yojana for army childrens

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.