नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2024 / Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024

nanaji-deshmukh-krushi-sanjivani-yojana-2024

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 :- नमस्कार मित्रहो आज आपण या लेखामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी असणारी अर्जप्रक्रिया, लागणारी कागदपत्रे, कोण कोण या योजनेसाठी पात्र असणार आहेत अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रहो तुम्हाला पण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य वाचा. 

आपल्या देशामध्ये शेती आणि शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपल्या देशाला कृषि प्रधान देश म्हणतात पण या देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी शेतकरी हा सक्षम बनला पाहिजे कारण शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हा प्रकल्प सुरू केला आहे ही योजना देशातील सर्व शेतकऱ्यांना नवीन जीवन देणारी ठरणार आहे एक प्रकारे पहिले तर ही योजना संजीवनी ठरणार आहे त्यामुळे या योजणेच नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा ) 2024 ठेवण्यात आले आहे. 


या योजनेनुसार शेतकऱ्यांना शेती संबंधीत विविध योजना उपलब्ध करून देण्यात येत आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांना जोडधंदा आहे जसे की मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन, रेशीम शेती, पशुपालन अश्या शेतकऱ्यांना पण या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 


नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे स्वरूप 

nanaji deshmukh krushi sanjivani yojana 2024

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2024 या योजनेच्या प्रस्तावाला  सरकारने मंजूरी दिली आहे या प्रस्तावानुसार सरकार 4000 कोटी रुपये इतका निधी खर्च करणार आहे. या योजनेनुसार राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची लागवड करण्यावर भर देण्यात येतो ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे होणाऱ्या परिनामास सामना करण्यात मदत होणार आहे. 


सदर योजना महाराष्ट्र राज्यातील 5142 गावांमध्ये सुरू आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यामधील अल्पभूधारक आणि मध्यमभूधारक शेतकरी घेत आहेत तसेच या योजनेचा लाभ विदर्भ आणि मराठवड्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहेत. सदर योजना ही गावपातळीवर राबविण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत विविध योजना व सहाय्य  शेतकऱ्यांना मिळणार आहे. 


नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले प्रकल्प 

nanaji deshmukh krushi sanjivani yojana included project 

  • नवीन विहिरी 
  • विहीर पुनर्भरण 
  • गोड्या पाण्यातील मत्स्यपालन 
  • इतर कृषी आधारित उद्योग 
  • गांडूळ खत यूनिट 
  • नाडेप कंपोस्ट 
  • शेड नेट हाऊस 
  • पॉली हाऊस / शेड नेतसह फ्लॉवर / भाजीपाला लागवड 
  • रेशीम 
  • क्षारोपण 
  • फळबाग लागवड 
  • पॉली हाऊस 
  • सेंद्रिय निविष्ठा उत्पादन यूनिट 
  • शेततळे 
  • फील्ड अस्तर 
  • मधुमक्षिका पालन 
  • ठिंबक सिंचन संच 
  • फ्रॉस्ट संच
  • पंप संच 
  • पाईपलाईन 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये समाविष्ट असणारे जिल्हे 

nanaji deshmukh krushi sanjivani yojana included district 

  • औरंगाबाद 
  • उस्मानाबाद 
  • बुलडाणा 
  • बीड 
  • नांदेड 
  • अकोला 
  • जालना 
  • परभणी 
  • वाशिम 
  • जळगाव 
  • हिंगोली 
  • यवतमाळ 
  • लातूर 
  • अमरावती 
  • वर्धा 


नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी असणारी आवश्यक पात्रता 

nanaji deshmukh krushi sanjivani yojana eligibility 

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातिल कायमचा रहिवाशी असावा. 
  • या योजनेनुसार अल्पभूधारक आणि मध्यमवर्गीय शेतकरी पात्र असणार आहेत. 
  • आधार कार्ड 
  • रहिवाशी प्रमाणपत्र 
  • ओळखपत्र 
  • मोबाईल नंबर 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 


नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे 

nanaji deshmukh krushi sanjivani yojana require documents 

  • अर्जदारचा 7/12 आणि उतारा 
  • अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याचा पुरावा 
  • अर्जदार हा अक्षम असल्याचे प्रमाणपत्र 
  • आधार कार्ड 
  • पासपोर्ट साइज आकाराचा फोटो 
  • इतर वेगववेगळ्या योजणांसाठी वेगवेगळे कागदपत्रे लागू असतील.  

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी असणारी अर्जप्रक्रिया 

nanaji deshmukh krushi sanjivani yojana application process 

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे आणि करू शकता आपले अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये सविस्तर माहिती घ्या आणि अर्ज करा ऑनलाईन पद्धतीने खालील प्रकारे अर्ज करू शकता.


या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. 


सारांश 


आशा करतो की हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या योजनेच्या Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 बाबतीत संपूर्ण माहिती ( या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, मिळणारे अनुदान,लागणारी पात्रता, मिळणारी साधने ) मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.