राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना: अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस / national food security abhiyan

national-food-security-abhiyan


national food security abhiyan :

नमस्कार शेतकरी मित्रहो आज आपण या लेखामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेच्या बाबतीत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लागणारी पात्रता, अर्ज कसा करायचा, अर्ज कुठुन करायचा, लागणारी कागदपत्रे, कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे या प्रकारची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख  तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक अवश्य वाचा. 


केंद्र सरकार हे पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वाढवणे शेत शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधणे  हे ध्येय  समोर ठेवून नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते अशाच योजनांपैकी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना ही एक योजना आहे. सन 2007-2008 पासून राज्यात केंद्र सरकार द्वारे पुरस्कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजना राबविण्यात आली आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सदर अभियानानुसार भात, गहू, कडधान्य व भरड धान्य या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.  सण 2014-2015 पासून बारावी पंचवार्षिक योजनेसाठी च्या मार्गदर्शक सूचनानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 


सन 2018 - 19 व  2019 - 20  वर्ष केंद्र शासनाने पौष्टिक तृणधान्य ( न्युट्री सिरीयल ) वर्ष म्हणून जाहीर केली आहेत.  त्यास अनुसरून सन  2018 - 19 पासून केंद्र शासनाने पूर्वीच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान भरडधान्य अभियानात बदल करून दोन स्वतंत्र अभियाने राबविण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-  भरडधान्य अंतर्गत मका पीक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -  पौष्टिक तृणधान्य (न्युट्री सिरीयल ) अंतर्गत बाजरी, ज्वारी व रागी या पिकांसाठी स्वतंत्र अभियान सुरू केली आहेत.  या दोन अभियानांसाठी अभियाननिहाय नव्यानेच स्वतंत्र नियतवयी निर्धारित केला आहे. 


या योजनेसाठी अर्थ सहाय्य केंद्र हिस्सा 60 टक्के व राज्य हिस्सा 40 टक्के असा आहे . 


राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान  योजना वैशिष्ट्य 

national food security abhiyan 

  • पिकांचे क्षेत्र आणी  उत्पादकता वाढविणे . 
  • शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे. 
  • शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविणे.  
  • शेतीतील कीड व्यवस्थापन करणे. 
  • शेतीतील रोग व्यवस्थापन करणे. 
  • पीकसंरक्षण करणे तसेच पीकातील तणनाश करणे. 
  • शेतीमध्ये जैवीक खताचा वापर करन्यास  शेतकऱ्यांना  प्रेरीत करणे. 
  • शेतीसाठी आधुनिक यंत्रणा पुरवठा करणे. 
  • शेतीमध्ये सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर वाढविणे. 

या अभियानात खालील बाबी व घटक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहेत national food security abhiyan


  • शेतकऱ्यांच्या शेतात पीक प्रात्यक्षिके. 
  • प्रमाणित बियाणे वितरण. 
  • प्रमाणित बियाणे उत्पादन. 
  • पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण (शेतीशाळा).
  •  सूक्ष्म मूलद्रव्ये. 
  • जिप्सम. 
  • जैविक खते. 
  • पीक संरक्षण औषधे. 
  • तणनाशके. 
  • पंपसंच. 
  • गोदाम बांधकाम. 
  • दाल मिल. 
  • बीज प्रक्रिया संच. 
  • मका सोलणी यंत्र. 
  • क्लिनर कम ग्रेडर. 
  • रीपर. 
  • थ्रेशर. 
  • पॉवर टिलर. 
  • ट्रॅक्टर. 
  • रोटाव्हेटर. 
  • पेरणी यंत्र. 
  • बहुपीक मळणी यंत्र 

वरील सर्व बाबींवर या योजनेनुसार  शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे. 


राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेनुसार शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान 

१. पीक प्रात्यक्षिकांसाठी मिळणारे अनुदान (रु)

 पिक प्रात्यक्षिकां साठी विभागिय स्तरावर  कृषी  विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा/तालुका/पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान पैकेज नुसार सर्व घटक अंमलबजावणी साठी हे अनुदान आहे.


पीक प्रात्यक्षिकांसाठी कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा, तालुका, पीकअनुसार निर्धारित तंत्रज्ञान पैकेजनुसार सर्व घटक अमलबजावणी साठी हे अनुदान आहे. रासायनिक खतावरील खर्च हा शेतकऱ्यांनी स्वत: करायचं आहे त्यासाठी अनुदान मिळणार नाही. 




 



पिकाचे/योजनेचे  नाव

पिक प्रात्यक्षीक प्रकार

निविष्ठा

शेतिदिन

प्रशिक्षण साहित्य

शास्त्रज्ञ भेट व सल्ला

एकूण (रु.)

भात

सलग क्षेत्रावरील गट प्रात्यक्षीके (श्री पद्धत/ओळीत पुनर्लागवड/यांत्रिकी पद्धतीने भात लागवड)

8200

250

250

300

9000

पिक पद्धतीवर आधारीत प्रात्यक्षीके (भात पिकानंतर कडधान्य -हरभरा/चवळी /राजमा/वाल)

14200

250

250

300

15000

गहु

सलग क्षेत्रावरील गट प्रात्यक्षीके (पाण्याचा ताण सहन करणारे / बायोफोर्टिफाइड वाण )

8200

250

250

300

9000

पिक पद्धतीवर आधारीत प्रात्यक्षीके (मुग /उडीद /सोयाबीन नंतर गहु )

14200

250

250

300

15000

कडधान्य

सलग क्षेत्रावरील गट प्रात्यक्षीके (तुर ,मुग ,उडीद , हरभरा )

8200

250

250

300

9000

आंतरपिक पद्धतीवर प्रात्यक्षीके (सोयाबीन + तुर )

8200

250

250

300

9000

पिक पद्धतीवर आधारीत प्रात्यक्षीके (मुग ,उडीद नंतर रबी ज्वारी/ मुग ,उडीद नंतर गहु/भात नंतर हरभरा/बाजरी नंतर हरभरा)

14200

250

250

300

15000

भरड धान्य (मका)

सलग क्षेत्रावरील गट प्रात्यक्षीके (मका)

5200

250

250

300

6000

आंतरपिक पद्धतीवर प्रात्यक्षीके (मका + सोयाबीन /मका + तुर)

5200

250

250

300

6000

पौष्टिक तृणधान्य-

सलग क्षेत्रावरील गट प्रात्यक्षीके(ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई )

5200

250

250

300

6000

भात पड क्षेत्रावर कडधान्य उत्पादन

सलग क्षेत्रावरील गट प्रात्यक्षीके (हरभरा/लाखोळी)

8200

250

250

300

9000


२.  प्रमाणित बियाणे वितरण यासाठी अनुदान



पिकाचे/योजनेचे  नाव

बियाणे वाणाचा प्रकार

अनुदान

भात

१० वर्षाच्या आतील अधिसूचित सुधारित वाण

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. २००० प्रति क्विंटल

१० वर्षाच्या वरील अधिसूचित सुधारित वाण

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. १००० प्रति क्विंटल

गहु

१० वर्षाच्या आतील अधिसूचित सुधारित वाण

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. २००० प्रति क्विंटल

१० वर्षाच्या वरील अधिसूचित सुधारित वाण

किमतीच्या ५० टक्के,कमालरु. १००० प्रति क्विंटल

कडधान्य (तुर ,मुग ,उडीद, हरभरा)

१० वर्षाच्या आतील अधिसूचित सुधारित वाण

किमतीच्या ५० टक्के,कमालरु.५००० प्रति क्विंटल

१० वर्षाच्या वरील अधिसूचित सुधारित वाण

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. २५०० प्रति क्विंटल

भरड धान्य (मका)

१० वर्षाच्या आतील अधिसूचित संकरित वाण

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. १०००० प्रति क्विंटल

पौष्टिक तृणधान्य- (ज्वारी/ बाजरी /नाचणी )

१० वर्षाच्या आतील अधिसूचित सुधारित वाण

किमतीच्या ५० टक्के,कमालरु. ३००० प्रति क्विंटल

१० वर्षाच्या वरील अधिसूचित सुधारित वाण

किमतीच्या ५० टक्के,कमालरु. १५०० प्रति क्विंटल

१० वर्षाच्या आतील अधिसूचित संकरित वाण

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. १०००० प्रति क्विंटल

१० वर्षाच्या आतील अधिसूचित सुधारित वाण

किमतीच्या ५० टक्के,कमालरु.५००० प्रति क्विंटल

भात पड क्षेत्रावर कडधान्य उत्पादन

१० वर्षाच्या वरील अधिसूचित सुधारित वाण

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. २५०० प्रति क्विंटल



 ३. प्रमाणित बियाणे उत्पादन करण्यासाठी अनुदान 


हे अनुदान महाबीज,राष्ट्रीय बीज निगम,कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे,नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी विज्ञान मंडळ यांना देण्यात येते. या बीजोत्पादक संस्थांनी बियाणे उत्पादन कार्यक्रमाची नोंदणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे करणे आवश्यक आहे.

मागील १० वर्षाच्या आतील राज्यासाठी अधिसूचित झालेल्या व शिफारस केलेल्या वाणांचे राज्यातच उत्पादन केलेल्या वाणांसाठी हे अनुदान देण्यात येते. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडील मुक्तता अहवालाच्या आधारे हे अनुदान देण्यात येते.

तूर,मूग,उडीद, हरभरा या कडधान्य पिकांचे प्रमाणित बियाणे उत्पादन करण्यासाठी रु. ५००० प्रती क्विंटल याप्रमाणे अनुदान तर ज्वारी बाजरी नाचणी वरई या पिकांचे  प्रमाणित बियाणे उत्पादन करण्यासाठी किमतीच्या ५० टक्के कमाल रु. ३००० प्रति क्विंटल इतके अनुदान देण्यात येते. 

बीजोत्पादक संस्थेने बीजोत्पादन कार्यक्रम शेतकऱ्यांच्या शेतावर घेतला असल्यास संस्थेने नोंदणी शुल्क,बियाणे प्रक्रिया इ.साठी २५ टक्के रक्कम स्वतः कडे ठेवावी व उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रीयीकृत बँक खात्यावर जमा करावी. 




४. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणेसाठी अनुदान 



यामध्ये सूक्ष्म मुल द्रव्ये, जिप्सम, व जैविक खते या बाबींचा समावेश होतो.


४ अ . सूक्ष्म मुल द्रव्ये वापर करणेसाठी अनुदान


भात गहू कडधान्य भरडधान्य पौष्टिक तृणधान्य या पिकांसाठी सूक्ष्म मुल द्रव्याच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 500 प्रती हे. अनुदान देय आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने शिफारशी प्रमाणे सूक्ष्म मुल द्रव्ये खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावीत व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल. लाभार्थी शेतकरी यांनी कृषी निविष्ठांची खरेदी कैशलेस पद्धतीने अथवा रोखीने करावी.  लाभार्थी शेतकरी यांनी वस्तू व सेवा कर क्रमांक असलेली खरेदी पावती सादर करणे बंधनकारक राहिल. तसेच एका लाभार्थी शेतकरी यांना एका वर्षात सर्व बाबी मिळून जास्तित जास्त 5 हेक्टर पर्यंत लाभ घेता येइल. 



४ ब . जिप्सम वापर करण्यासाठी अनुदान


कडधान्य पिकांकरीता (तूर, मूग, उडीद, हरभरा) जिप्समचा  वापर जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशी नुसार करावा. जिप्सम च्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के , कमाल रु. 750 प्रती हे. अनुदान देय आहे.लाभार्थी शेतकरी गटाने शिफारशी प्रमाणे  खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावी व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.


४क.-जैविक खते वापर करणेसाठी अनुदान


सदर बाब फक्त कडधान्य (तूर,मूग,उडीद,हरभरा) व पौष्टिक तृण धान्य (ज्वारी,बाजरी,नाचणी, वरई ) कार्यक्रमासाठी लागू आहे. 

कृषी विभागाच्या जैविक प्रयोगशाळे मार्फत पिक गटास आवश्यक द्रवरुप जैविक खते/जैविक खते संघ (liquid consortia) तयार करण्यात येत असुन सदर खतांची बीज प्रक्रिया केल्यास उत्पादन खर्चात बचत करुन पिकांच्या उत्पादकतेत वाढ होते. 


द्रवरुप जीवाणू संघ (liquid consertia) यामध्ये नत्र स्थिरी करण करणारे, स्फूरद विरघळविणारे व जस्त विरघळविणारे जीवाणू उपलब्ध करुन देणारे यापैकी कमीत कमी दोन किंवा अधिक जिवाणुंचा समावेश असतो.


शेतकरी गटाने जीवाणू खतांची खरेदी प्रथम प्राधान्याने शासकीय प्रयोग शाळा, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र यांच्या कडून करावी.


शेतकरी यांना खुल्या बाजारातुन जीवाणू खते खरेदी करावयाची असल्यास किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.300 प्रती हेक्टर अनुदान देय आहे. 


शेतकरी गटाने खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावीत व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.



५ .एकात्मिक किड/रोग व्यवस्थापन करणेसाठी अनुदान



५ अ . किडनाशके खरेदीसाठी अनुदान


राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान -अन्नधान्य पिके अंतर्गत सर्व पिकांसाठी हे अनुदान देय आहे. यासाठी 50 टक्के, कमाल रु.500 प्रती हेक्टर अनुदान देय आहे. लाभार्थी शेतकरी गटाने कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार  खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या पीक संरक्षण औषधांची  खरेदी करावी व त्यानंतर गटातील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येते .


५ ब . तण नाशके खरेदीसाठी अनुदान 


भात गहू कडधान्य भरडधान्य पौष्टिक तृणधान्य या पिकांसाठी तण नाशकाच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के , कमाल रु.500 प्रती हे. अनुदान देय आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने  खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या तण नाशकांची खरेदी करावी व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.


६ .कृषी औजारे तसेच पंप संच व पाईप खरेदी करण्यासाठी अनुदान - 

यासाठी mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे







अ. क्र.

अवजाराचे नाव

अजा/अज /महिला/अल्प व अत्यल्प भूधारक

इतर शेतकरी

कोणत्या योजनेतून घेता येईल

1

क्लीनर कम ग्रेडर

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु.१ लाख

किमतीच्या ४० टक्के,कमाल रु.८००००/-

पौष्टिक तृणधान्य

2

रीपर ( ३५ बीएचपी वरील ट्रॅक्टर चलीत )

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु.७५०००/-

किमतीच्या ४० टक्के,कमाल रु.६००००/-

पौष्टिक तृणधान्य , भात, गहू

3

थ्रेशर (५ बीएचपी इलेक्ट्रिक मोटार /पॉवर टीलर /३५ बीएचपी आतील ट्रॅक्टर चलीत )

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. ४००००/-

किमतीच्या ४० टक्के,कमाल रु.३००००/-

पौष्टिक तृणधान्य

4

पॉवर टिलर ( ८ बीएचपी व त्यावरील)

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. ८५०००/-

किमतीच्या ४० टक्के,कमाल रु.७००००/-

पौष्टिक तृणधान्य , भात , गहु , कडधान्य

5

ट्रॅक्टर (२ WD , २०-४० पीटीओ एचपी वरील)

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. १.२५ लाख

किमतीच्या ४० टक्के,कमाल रु.१ लाख.

पौष्टिक तृणधान्य

6

रोटाव्हेटर ८ फुट (३५ बीएचपी वरील ट्रॅक्टर चलीत )

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. ५०४००/-

किमतीच्या ४० टक्के,कमाल रु.४०३००/-.

पौष्टिक तृणधान्य , भात ,गहु , कडधान्य

7

पेरणी यंत्र (Seed Drill) (३५ बीएचपी वरील ट्रॅक्टर चलीत )

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. २००००/-

किमतीच्या ४० टक्के,कमाल रु.१६०००/-.

भात , गहु , कडधान्य

8

पॉवर वीडर (Engine operated above 2 bhp)

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. २५०००/-

किमतीच्या ४० टक्के,कमाल रु.२००००/-

भात

9

मळणी यंत्र (Tractor driven above 35 bhp)

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु.१ लाख

किमतीच्या ४० टक्के,कमाल रु.८००००/-

भात

10

बहुपिक मळणी यंत्र (Tractor driven above 35 bhp)

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु.२.५० लाख

किमतीच्या ४० टक्के,कमाल रु. २ लाख

गहु , कडधान्य

11

झिरो टिल सीड कम फर्टिलायझर ड्रील (Tractor driven above 35 bhp)

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. २८०००/-

किमतीच्या ४० टक्के,कमाल रु.२२४००/-

गहु

12

मका सोलणी यंत्र

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. १ लाख


मका

13

पंप संच

किमतीच्या ५० टक्के,कमाल रु. १००००/-

किमतीच्या ४० टक्के,कमाल रु.८०००/-

भात, गहु,कडधान्य,

14

पाइप (एचडीपीई )

किमतीच्या 50 टक्के, कमाल रु.50 प्रती मिटर.

किमतीच्या 50 टक्के, कमाल रु.50 प्रती मिटर.

भात, गहु,कडधान्य,

पाइप (पीव्हीसी )

किमतीच्या ५० टक्के, कमाल रु.३५ प्रती मिटर.

किमतीच्या ५० टक्के, कमाल रु.३५ प्रती मिटर.

भात, गहु,कडधान्य, 

पाइप-HDPE laminated woven by flat tubes-

किमतीच्या 50 टक्के, कमाल रु.20 प्रती मिटर.

किमतीच्या 50 टक्के, कमाल रु.20 प्रती मिटर.

भात, गहु,कडधान्य,



पाइपसाठी एका शेतकऱ्याला कमाल रु. १५००० /- अनुदान मिळेल.         




६. पिक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण व इतर बाबी 




बाब 

अनुदान / तरतूद 

विषय 

कोणत्या अनुदानातून घेता येईल 

शेतकरी प्रशिक्षण (शेतीशाळा )

रु, 14000 

30 शेतकऱ्यांसाठी पीक पध्दतीवर आधारित प्रशिक्षण 

भात, गहू, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य 

जनजागृती / प्रचार प्रसिध्दी 

रु, 1,00,000 


पौष्टिक तृणधान्य 

जिल्हास्तरीय कार्यशाळा 

रु, 2,50,000


पौष्टिक तृणधान्य 

संकीर्ण खर्च 

रु, 2,00,000

वाहन भाडोत्री घेणे रु, 1,20,000, कार्यालयीन संगणक / स्टेशनरी  रु,0.50 लाख व इतर संकीर्ण बाबींसाठी रु, 0.30 लाख 

कडधान्य 




 

७. प्रकल्प व्यवस्थापन चमू


जिल्हा स्तरावर १ तंत्र सल्लागार व २ तंत्र सहाय्यक.




८ . स्थानिक पुढाकाराच्या बाबी




बाब

कुणाला लाभ घेता येईल

विषय

अनुदान

कोणत्या योजनेतून घेता येईल

अर्ज कुठे करावा

गोदाम बांधकाम

शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपनी

२५० मे. टन क्षमतेचे. बँक कर्जाशी निगडीत.जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी स्तरावरून पूर्वसंमती दिल्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यात येतील.वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषाप्रमाणे डिझाइन, स्पेसीफिकेशन, खर्चाचे अंदाजपत्रकाप्रमाणे बांधकाम आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक आहे. बँक प्रतिनिधी , बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तालुका कृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांच्या संयुक्त मोका तपासणी अहवालाच्या आधारे अनुदान राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात येते.

५० टक्के, कमाल रु. १२.५० लाख

भात गहु कडधान्य

तालुका कृषि अधिकारी कार्यालयात.

बीज प्रक्रिया प्रकल्प

शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपनी

यंत्रसामग्री व बांधकामासाठी.बँक कर्जाशी निगडीत. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी स्तरावरून पूर्वसंमती दिल्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यात येतील. बँक प्रतिनिधी , तालुका कृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांच्या संयुक्त मोका तपासणी अहवालाच्या आधारे अनुदान राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात येते.

५० टक्के, कमाल रु. १० लाख

कडधान्य

तालुका कृषि अधिकारी कार्यालयात

मिनी राइस मील

शेतकरी /महिला गट


६० टक्के, कमाल रु. २.४० लाख

भात

mahadbtmahait.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा

मिनी दाल मील

शेतकरी /महिला गट


६० टक्के, कमाल रु. १.५० लाख

कडधान्य

mahadbtmahait.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा

मूल्यवर्धनासाठी स्थानिक वाणांची लागवड प्रात्यक्षीके

शेतकरी

शेतकऱ्याकडे किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असावे.

५० टक्के, कमाल रु.४५००/ हेक्टर

भात


मूल्यवर्धनासाठी स्थानिक वाणांची लागवड प्रात्यक्षीके

शेतकरी

शेतकऱ्याकडे किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असावे.

५० टक्के, कमाल रु.७५००/ हेक्टर

कडधान्य


भात शेतीमध्ये मत्स्यपालन

अजा/अज /अल्प /अत्यल्प/महिला


५० टक्के, कमाल रु.२५०००/ एकर

भात


भात शेतीमध्ये मत्स्यपालन

इतर शेतकरी


४० टक्के, कमाल रु.२००००/ एकर

भात




राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान  योजना पात्रता 


1) केंद्र शासनाने पीकनिहाय निवडलेले जिल्हे खालीलप्रमाणे


राअसुअ भात

  नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)


राअसुअ गहू

  सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)


राअसुअ कडधान्य

  सर्व जिल्हे


राअसुअ भरडधान्य

  (मका) सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).


राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल)

  ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)


अ) ज्वारी 

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)


ब) बाजरी 

 नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)


क) रागी 

नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे (पालघर सह), रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)


ड) कापूस

 (अमरावती विभाग) – बुलढाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ.
(नागपूर विभाग) – वर्धा,नागपूर,चंद्रपूर.


इ) ऊस

(औरंगाबाद विभाग) – औरंगाबाद, जालना, बीड.
(लातूर विभाग) – लातूर,उस्मानाबाद,नांदेड,परभणी,हिंगोली.

जर शेतकरी तांदूळ, गहू, डाळी,कापूस,ऊस यांच्या अंतर्गत येत असलेल्या कोणत्याही घटकासाठी अर्ज करीत असेल तर वरील दिलेले जिल्हे त्या घटकांसाठी अनिवार्य राहतील.


2) कोणत्याही बाबीसाठी फक्त एकाच योजनेतून अनुदान देय आहे.


3) शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.


4) जर लाभार्थ्याला गळीतधान्य पिके यामधून लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांच्या शेतात गळीतधान्य पिके असणे आवश्यक आहे आणि जर लाभार्थ्याला वृक्षजन्य तेलबिया पिके यामधून लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे.


5) संबंधीत शेतक-याचे स्वतःचे नावे ७/१२ व ८/अ उतारा असणे बंधनकारक राहील.



राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान  योजना लागणारी कागदपत्रे 


  •  ७/१२ प्रमाणपत्र. 
  •  ८-ए प्रमाणपत्र. 
  • खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता)
  • केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी). 
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास). 
  •  हमीपत्र.
  • पूर्वसंमती पत्र.


फळबाग योजनेच्या माहिती साठी येथे क्लिक करा

महाडीबीटी योजनेच्या माहितीसाठी क्लिक करा

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान  योजना अर्जप्रक्रिया 

national food security abhiyan 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही घरी बसून ऑनलाइन मोबाइल किंवा लॅपटॉप च्या माध्यमातून अर्ज करू शकता . अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे येथे क्लिक करा


सारांश 

आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान national food security abhiyan   योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.


                                                                                      national food security abhiyan 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.