पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेनुसार मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ / pandit dindyal upadhyay gharkul jaga yojna 2024

pandit-dindyal-upadhyay-gharkul-jaga-yojna-2024

pandit dindyal upadhyay gharkul jaga yojna 2024 :- नमस्कार मित्रहो आज आपण या लेखामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमध्ये करण्यात आलेल्या बदलावा बद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तुम्हालापण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा. 


काय आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना 

pandit dindyal upadhyay gharkul jaga yojna 2024

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना ही इंदिरा आवास योजनेचा एक भाग म्हणून ग्रामीण भागातील दरिद्रय रेषेखालील बेघरांपैकी ज्यांना स्वत:ची जागा नाही आशा कुटुंबाकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आली आहे. राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनानुसार ग्रामीण भागातील लाभार्थी असलेल्या कुटुंबांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान दिले जाते परंतु काही लाभार्थी असे असतात की ज्यांच्या कडे घरकुल योजनांचा लाभ घेण्यासाठी स्वत:ची जागा नसते या बाबीचा विचार करून सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेची सुरुवात केली आहे. 


फक्त जागेच्या कमतरतेमुळे घरकुल योजनांचा लाभ मिळविण्यापासून लाभार्थी वंचित राहु नयेत यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सदर योजनेची सुरुवात केली आहे. ग्रामीण घरकुल योजनेतील काही लाभार्थी हे घरकुलासाठी जागा नसल्यामुळे सार्वजनिक क्षेत्र किंवा नातेवाईक, मित्रमंडळ यांच्या घरात आसरा घेतात परंतु जागेची मालकी त्यांच्या नावावर नसते. या बाबी विचारात घेऊन घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसलेल्या दरिद्रय रेषेखालील कुटुंबांना जागा खरेदीसाठी अतिरिक्त अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी घरकुल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना शासनातर्फे राबविण्यात आली आहे. 


पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेनुसार मिळणारे अर्थसहाय्य 

pandit dindyal upadhyay gharkul jaga yojna 2024

केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजना,प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत पात्र ठरलेल्या  दारिद्रय रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी केंद्र शासनामार्फत रु. १०,०००/-  व या योजनेनुसार रु. ४०,०००/- असे एकूण रु. ५०,०००/- पर्यंत अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असे पण दि १०/०१/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार हे अर्थसाहाय्य हे वाढवून रु १,००,०००/- करण्यात आले आहे.


पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेसाठी लाभार्थी पात्रता 


केंद्र व राज्य पुरस्कृत गृहनिर्माण योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. 


पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 


या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन नसून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गट विकास अधिकारी पंचायत समिति यांच्याशी संपर्क करावा. 


सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा अर्थसाहाय्य योजना pandit dindyal upadhyay gharkul jaga yojna 2024 या योजनेनुसार मिळणाऱ्या अर्थसाहाय्यत करण्यात आलेल्या वाढीबाबतीत संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.




pandit dindyal upadhyay gharkul jaga yojna 2024


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.