पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना / pmegp yojana in marathi

 pmegp yojana in marathi


pmegp yojana in marathi :- नमस्कार मित्रहो आज या लेखामध्ये आपण पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना या केंद्रासरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, असणारी पात्रता, कोण कोण या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत अशी परिपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्हालापण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा. 


पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना ही केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु व माध्यम उद्योग मंत्रालयामार्फत राबविण्यात आली आहे. या योजनेची अंबलबजावणी ही खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग बोर्ड या कार्यालयामार्फत ग्रामीण भागांमध्ये व जिल्हा उद्योग केंद्रातर्फे शहरी व ग्रामीण भागांमध्ये केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यांमधील बेरोजगार असणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे. त्यांच्या हाताला काम मिळावे, स्वत:चा व्यवसाय करता यावा हे ध्येय समोर ठेवून सरकार हे गरजू असणाऱ्या नागरिकांना केवळ नाममात्र व्याजदरावर कर्ज देण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून करत आहे. 


पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना उद्देश 

pmegp yojana purpose

  • या योजनेमुळे तरुणांना व्यवसाय करण्यासाठी पैसे मिळतील. 
  • या योजणेमुळे राज्यातील बेरोजगरीचे प्रमाण कमी होईल. 
  • या योजनेचा लाभ घेऊन तरुण स्वत:चा व्यवसाय उभा करू शकतील. 
  • या योजणेमुळे लोकांना रोजगार प्राप्त होईल. 

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना वैशिष्ट्य 

pmegp yojana speciality 
  • बेरोजगरीचे प्रमाण कमी होईल. 
  • देशातील तरुण नागरिकांना उद्योग करण्यासाठी कर्ज मिळे ज्यामुळे ते सक्षम बनतील. 
  • तरुण वर्ग सक्षम झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेले.
  • देशाचा पाया मजबूत बनेल. 
  • तरुणांच्या कलागुणांना वाव मिळेल. 
  • देशातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील.
  • देश समृद्धीच्या दिशेने चाल करेल.
  • या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन करण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार व्यक्तिना कोणत्याही प्रकारची परेशानी होणार नाही. 
  • या योजनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात 75 प्रकल्प मंजूर करण्यात येणार आहेत. 

 पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना सबसिडी 

pmegp yojana subsidy 

देशामध्ये रोजगाराची संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने सरकार हे या योजनेची सुरुवात केली आहे सरकारच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे, आणि संपूर्ण देशामध्ये रोजगारासाठी संधि निर्माण करण्यासाठी सरकार मंत्रालये आणि देशांतर्गत विविध विभागाच्या माध्यमातून अनेक पावले उचलत आहे. 


पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेनुसार बनवण्यात आलेल्या श्रेणी 

pmegp yojana categiries 

या कर्ज योजनेनुसार व्यवसाय कर्ज हे दोन श्रेणीनुसार दिले जाते या दोन श्रेणी खालीलप्रमाणे आहेत. 


  1. खुली श्रेणी 

  2. SC,ST,अपंग, महिला आणि सेवानिवृत्त व्यक्ती. 


खुल्या श्रेणीसाठी कर्ज योजना 


या योजनेनुसार कहील्या प्रवर्गातील बेरोजगार युवकांना ग्रामीण भागामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्याकरिता 25% पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. 

जर एखाद्या खुल्या प्रवर्गातील व्यक्तिला शहरी भागामध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यक्तिल 15 टक्के अनुदान देण्यात येईल. या अनुदानामध्ये अर्जदारांना स्वत:ची 10 टक्के गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच SC,ST,OBC,अपंग, महिला, आणि सेवानिवृत्त सैनिक व्यक्ति यांना या योजनेनुसार ग्रामीण भागांमध्ये उद्योग / व्यवसाय सुरू करण्यासाठी 35% अनुदान देण्यात येईल. 

शहरी भागामध्ये उद्योग / व्यवसाय सुरू करण्यासाठी 25% अनुदान देण्यात येणार आहे. या मध्ये त्यांना 55 स्वत: गुंतवणूक करावी लागणार आहे. 



व्याज दर 

वेगवेगळी बँक 


कमीत कमी 18 वर्षे 

जास्तीत जास्त प्रकल्प खर्च 

उत्पादन प्रकल्पासाठी 25 लाख / सेवा उद्योगांसाठी 20 लाख 

प्रकल्प अनुदान 

15% ते 35%

पात्र अर्जदार 

व्यवसाय मालक, संस्था, सहकारी संस्था, धर्मादाय ट्रस्ट आणि बचत गट 

शैक्षणिक पात्रता 

किमान इयत्ता 8 वी पास 



पंतप्रधान रोजगार निर्मित योजनेनुसार मिळणारा निधी आणि अनुदान 

pmegp yojana in marathi 

लाभार्थी श्रेणी 

लाभार्थी वाटा 

अनुदान दर (सरकार

तर्फे शहरी )

अनुदान दर (सरकार तर्फे 

 ग्रामीण )

सामान्य 

10%

15%

25%

विशेष 

5%

25%

35%



पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत येणारे उद्योग 

pmegp yojana in marathi 

  • PMEGP योजनेंतर्गत खालीलप्रमाणे उद्योग सुरु करता येतील 
  • कृषी आधारित अन्न प्रक्रिया 
  • सिमेंट आणि संबंधित उत्पादने 
  • रसायने/पॉलीमर आणि खनिजे 
  • कोल्ड स्टोरेज आणि कोल्ड स्टोरेज चेन सोल्युशन 
  • दुग्धजन्य पदार्थ आणि 
  • इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणे 
  • अन्न प्रक्रिया उद्योग 
  • वन उद्योग 
  • फलोत्पादन - सेंद्रिय शेती 
  • कागद आणि संबंधित उत्पादने 
  • प्लास्टिक आणि संबंधित सेवा 
  • सेवा क्षेत्रातील उद्योग 
  • लहान व्यवसाय मॉडेल 
  • कापड आणि पोशाख 
  • कचरा व्यवस्थापन   

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेनुसार मिळणारे लाभ 

pmegp yojana benefits 

  • योजना KVIC आणि राज्य/UT खादी आणि VI बोर्डांमार्फत ग्रामीण भागात आणि शहरी आणि ग्रामीण भागातील जिल्हा उद्योग केंद्रांद्वारे KVIC/KVIB/DIC मधील अनुक्रमे 30:30:40 च्या प्रमाणात लागू केली जाते.
  • प्रकल्पाच्या उभरणीकरिता कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. 
  • या योजनेनुसार सहाय्य फक्त नवीन स्थापन करणाऱ्या युनिट्सना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
  • चालू युनिट्स किंवा यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेतलेले युनिट्स राज्य सरकार किंवा केंद्र सरकार अंतर्गत अनुदान योजनेसाठी पात्र नाहीत. 
  • दरडोई गुंतवणूक रु. पेक्षा जास्त नसावी. 1.00 लाख मैदानी भागात आणि रु. डोंगराळ भागात 1.50 लाख. 
  • जास्तीत जास्त प्रकल्प खर्च रु. 25.00 लाख उत्पादन क्षेत्रात आणि रु. सेवा क्षेत्रात 10.00 लाख.
  • या योजनेंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग, रोजगार सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून 10 लाख ते 25 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  • या योजनेंतर्गत देशातील तरुणांना त्यांच्या जातीनुसार आणि क्षेत्रानुसार अनुदान दिले जाणार आहे. 
  • प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 2022 अंतर्गत, देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना कर्ज दिले जाईल. 
  • शहरी भागात PMEGP साठी नोडल एजन्सी जिल्हा उद्योग केंद्रे (DIC) आहे, तर ग्रामीण भागात खादी आणि ग्राम उद्योग मंडळ (KVIC). 
  • या योजनेचा लाभ ज्या बेरोजगार तरुणांना स्वतःचा रोजगार निर्माण करवयाचा आहे, त्यांनाच मिळणार आहे.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेनुसार खालील वर्गांना कर्ज देण्यात येईल. 

pmegp yojana in marathi 

  • अनुसूचित जाती. 
  • माजी सैनिक. 
  • अनुसूचित जमाती. 
  • अपंग. 
  • इतर मागासवर्गीय. 
  • उत्तर पूर्व राज्यातील नागरिक. 
  • अल्पसंख्यांक. 
  • सीमावर्ती भागात आणि डोंगराळ भागात राहणारे नागरिक. 
  • महिला.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेसाठी लागणारी पात्रता 

pmegp yojana requirements 

  • अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे. 
  • अर्जदार व्यक्ति कमीत कमी 8 वी पास असावा. 
  • बचत गट आणि धर्मादाय ट्रस्ट यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. 
  • सोसायटी नोंदणी कायदा - 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था उत्पादनावर आधारित सहकारी संस्था. 
  • जर अर्जदारणे या पूर्वी इतर कोणत्याही सबसिडी योजनेचा लाभ मिळवला असेल तर तो व्यक्ति या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. 

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 

pmegp yojana important documents

  • आधार कार्ड 
  • पॅनकार्ड 
  • जात प्रमाणपत्र 
  • पत्त्याचा पुरावा शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र 
  • मोबाइल नंबर 
  • पासपोर्ट साइजचा फोटो. 


पंतप्रधान रोजगार निर्मित योजनेसाठी असणारी अर्जप्रक्रिया

pmegp yojana in marathi 

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. 



सारांश

 

आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना pmegp yojana in marathi या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.




pmegp yojana in marathi

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.