भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना / post matric scholarship yojana 2024

 post-matric-scholarship-yojana-2024

post matric scholarship yojana 2024 :- महाराष्ट्र राज्य सरकार नेहमीच राज्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते आणि यासाठीच वेळोवेळी विविध योजना राबवित असते आज आपण अश्याच प्रकारच्या राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना या योजनेच्या बाबतीत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 

या योजनेनुसार अनुसूचित जातीतील पात्र / नवबौध्द जातीतील विद्यार्थ्याना शिष्यवृती दिली जाणार आहे. अनुसूचित जातीतील मुला - मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे त्यांच्या गुणवत्तेत वाढ करावी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन उच्चविद्याविभूषित व्हावे असा उद्देश ठेऊन अनुसूचित जातीतील आणि नवबौध्द विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना सन 1959 - 1960 पासून राबवित आहे .


  मित्रहो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल. 


 भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना उद्दिष्ट post           matric scholarship yojana 2024


  1. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
  2. विद्यार्थ्यांची  शिक्षण गळती कमी करण्यासाठी.
  3.  विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
  4. पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
  5. अनुसूचित जातीतील / नवबौध्द विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी या योजनेनुसार  शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जाईल. 


योजना 

भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

राज्य 

महाराष्ट्र 

विभाग 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 

उद्देश 

आर्थिक मदत करून शिक्षणासाठी प्रेरित करणे 

लाभ 

शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता दिल जाईल 

लाभार्थी 

नवबौध्द आणि अनुसूचित जातीतील विद्यार्थी 

अर्जप्रकिया 

ऑनलाइन 



 भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना वैशिष्ट्य 


  • या योजनेनुसार दिल्या जाणाऱ्या लाभाची रक्कम ही लाभार्थ्याचे बँक खात्यामध्ये DBTच्या सहाय्याने जमा केली जाणार आहे. 
  • केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या एकत्रीकरणाने या योजनेची सुरुवात झालेली आहे. 
  • समन्वय,  पारदर्शकता आणि शिष्यवृत्ती यासाठी लागणारा विलंब दूर करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे. 
  • या योजनेमध्ये केंद्र शासनाचा 60% हिस्सा आणि  राज्य शासनाचा 40%  हिस्सा आहे. 
  • योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि सोपी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदार विद्यार्थी घरी बसून आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने अर्ज करून या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू शकतो ज्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसे दोघांचे बचत होणार आहे. 


 भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना लाभार्थी 


राज्यातील सर्व अनुसूचित जातीतील किंवा नवबौद्ध विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. 



 भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना मिळणारे आर्थिक सहाय्य


या योजनेनुसार प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत नवबौद्ध /  अनुसूचित जातीतील पात्र विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे लाभ मिळणार आहेत. 



डे स्कॉलर (दरमहा रुपयामध्ये)



गट 1

देखभाल भत्ता

550/-  

गट 2

देखभाल भत्ता

530/-  

गट 3

देखभाल भत्ता

300/-  

गट 4

देखभाल भत्ता

230/- 



होस्टेलर (दरमहा रुपयामध्ये)



गट 1

देखभाल भत्ता

1200/- रुपये (दरमहा)

गट 2

देखभाल भत्ता

820/- रुपये (दरमहा)

गट 3

देखभाल भत्ता

570/- रुपये (दरमहा)

गट 4

देखभाल भत्ता

380/- रुपये (दरमहा)




दिव्यांग (अपंगत्व प्रकार) असलेल्या  विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त भत्ते खालील प्रकारे (दरमहा रुपयामध्ये)





अपंगत्वाचे प्रकार


गट 1

अंधत्व / कमी दृष्टी

150/- 

गट 2

अंधत्व / कमी दृष्टी

150/-

गट 3

अंधत्व / कमी दृष्टी

125/- 

गट 4

अंधत्व / कमी दृष्टी

100/-



कुष्ठरोग निवारण झालेले सर्व गटांसाठी (दरमहा रुपयामध्ये)


वाहतूक भत्ता

100/- रुपये पर्यंत

(वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)

स्कॉर्ट भत्ता

100/-

वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता

100/- 



शासन निर्णयातील (बी, सी, डी) प्रमाणे कर्णबधीर सर्व गटांसाठी अतिरिक्त भत्ते. (दरमहा रुपयामध्ये)



वाहतूक भत्ता

100/- रुपये पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)



अतिरिक्त भत्ते लोकोमोटर अपंगत्व सर्व गटांसाठी (दरमहा रुपयामध्ये)



वाहतूक भत्ता

100/- रुपये पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)




अतिरिक्त भत्ते मानसिक दुर्बलता / मानसिक आजार सर्व गटांसाठी



वाहतूक भत्ता

100/- रुपये पर्यंत

(वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)

एस्कॉर्ट भत्ता

100/- रुपये

वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता

100/- रुपये

अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता

150/- रुपये




अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी, इ) प्रमाणे ऑर्थोपेडिक अपंगत्व सर्व गटांसाठी



वाहतूक भत्ता

100/- रुपये पर्यंत

(वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)

एस्कॉर्ट भत्ता

100/- रुपये

वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता

100/- रुपये




विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिल्या जाणाऱ्या देखभाल भत्ता व्यतिरिक्त सर्व अनिवार्य शुल्क / अनिवार्य देय शुल्क अर्थात वित्तपुरवठा (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क) इ. या योजनेखाली समाविष्ट केले आहे.




 भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना लाभ 

   post matric scholarship yojana 2024

  • या योजने अंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जातो.
  • विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे ते सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेअंतर्गत शिक्षण गळती कमी होण्यास मदत होईल.
  • विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण होईल व ते पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी मिळेल.


 भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना आवश्यक पात्रता

      post matric scholarship yojana 2024

  • अर्जदार विद्यार्थ्यी महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा.
  • विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.


 भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना नियम व अटी 

      post matric scholarship yojana 2024

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 /- पेक्षा जास्त नसावे.
  • अयशस्वी : विद्यार्थी प्रथम वर्षी नापास झाला तरी त्याला परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता अनुज्ञेय राहील, एकाच वर्गात दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला / तिला कोणताही भत्ता मिळणार नाही. आणि दोन प्रयत्नानंतर विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेल्यास लाभ अनुज्ञेय राहतील.
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भारतसरकारच्या नियमानुसार समान नियम अनुज्ञेय राहतील.
  • फक्त २ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सदर योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असल्यास त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.


 भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना कागदपत्रे 

post matric scholarship yojana 2024


  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार द्वारे प्रदान)
  • जात प्रमाणपत्र
  • गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
  • इयत्ता 10वी किंवा 12वी परीक्षेची गुणपत्रिका
  • वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • शिक्षणातील खंड बाबतचे आणि स्व:घोषणापत्र (आवश्यक असल्यास)
  • वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • पतिचे उत्पन्न प्रमाणपत्र (अर्जदार जर स्त्री आहे आणि विवाहीत असल्यास)



भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना अर्जप्रक्रिया 


या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा



सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेची post matric scholarship yojana 2024 संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.





post matric scholarship yojana 2024

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.