राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना / rajarshri chhatrapati shahu maharaj merit scholarship yojana 2024

rajarshri-chhatrapati-shahu-maharaj-merit-scholarship-yojana-2024

Rajarshri Chhatrapati Shahu Maharaj Merit Scholarship Yojana 2024 :- नमस्कार विद्यार्थी मित्रहो आजच्या लेखामध्ये आपण राजश्री छत्रपती  शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना या योजनेच्या बाबतीत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लागणारी पात्रता, लागणारी कागदपत्रे, असणारे अटी आणि नियम तसेच कोण कोणते विद्यार्थी या योजनेसाठी पत्र ठरणार आहेत अश्याप्रकारची परिपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रहो तुम्हालापण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा लेख जरूर वाचा.

महाराष्ट्र राज्यसरकार हे राज्यातील शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासाठी महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून नेहमीच विविध कल्याणकारी योजना राबवित असते, अश्या प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून सरकार हे शेतकरी व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक पुरवठा करण्याचा सकारात्मक प्रयत्न करत असते. 


 राज्यातील कित्येक गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याना पैश्यांच्या कमतरतेमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते त्यामुळे अश्या प्रकारच्या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने जुलै 2003 मध्ये राजश्री छत्रपती  शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेनुसार अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते. 



राजश्री छत्रपती  शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना उद्देश 

 rajarshri chhatrapati shahu maharaj merit scholarship yojana purpose 

  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. 
  • विद्यार्थ्यांची शिक्षण गळती कमी करणे. 
  • विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे. 
  • पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना. 
  • अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे. 
  • सर्वसाधारण विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेमध्ये टिकून ठेवणे, गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे. 


राजश्री छत्रपती  शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना वैशिष्ट्य 

 rajarshri chhatrapati shahu maharaj merit scholarship yojana speciality 

  • या योजनेनुसार दिल्या जाणाऱ्या लाभाची रक्कम ही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी च्या सहाय्याने जमा केली जाणार आहे. 
  • या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि सोपी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदार विद्यार्थी घरी बसून आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने अर्ज करून या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू शकतो ज्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसे दोघांचे बचत होणार आहे. 
  • या योजणेमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनतील त्यांना पैशांसाठी कोणावर ही अवलंबून राहायची गरज राहणार नाही. 
  • भरपूर विद्यार्थी ही आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत असतात अश्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. 
  • ही योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबविण्यात आली आहे. 
  • या योजनेचा लाभ मुलगा आणि मुलगी दोघेपण घेऊ शकणार आहेत. 


राजश्री छत्रपती  शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना मिळणारा लाभ 

 rajarshri chhatrapati shahu maharaj merit scholarship yojana benifits 

  • राजश्री छत्रपती  शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना या योजनेनुसार शालांत परीक्षेत 75% गुण किंवा यापेक्षा अधिक गुण मिळवून पास झालेल्या आणि इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी. 
  • महिना 300 रुपये याप्रमाणे 10 महीने शिष्यवृत्ती देण्यात येईल. 
  • जे विद्यार्थी भारत शासनाच्या शिष्यवृत्ती योजना आणि फ्रीशिप योजनेचा लाभ घेत असतील त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल.    




अ / क्र 

वर्ग 

मिळणारी शिष्यवृत्ती 

कालावधी  

एकूण शिष्यवृत्ती 

अ 

११वी 

३००/- रुपये दरमहा

दहा महिने 

३०००/- रुपये 

१२वी 

३००/- रुपये दरमहा

दहा महिने 

३०००/- रुपये 



राजश्री छत्रपती  शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना नियम व अटी 

 rajarshri chhatrapati shahu maharaj merit scholarship yojana criteria 

  • अर्जदार विद्यार्थी ही अनुसूचित जाती प्रवर्गातील असावी. 

  • या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही यात नाही. 

  • अर्जदार विद्यार्थी ही इयत्ता 11 वी किंवा 12 वी वर्गांमध्ये शिकणारी असावी. 

  • शालांत परीक्षेत 75% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून पास झालेला व इयत्ता 11 वी किंवा 12 वी मध्ये शिकत असलेला फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थीच या योजनेसाठी पात्र असेल. 

  • सदर योजना ही फक्त 11 वी आणि 12 वी वर्गामध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयीन अनुसूचित जातीतील मुला / मुलींसाठी आहे. 

  • अर्जदार विद्यार्थी ही महाराष्ट्र राज्यातील मूल रहिवाशी असावी. 

  • ही योजना भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त राहणार आहे. 

  • सदर योजना दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या काल मर्यादेपूरतीच म्हणजेच दहा महिन्यांसाठी मंजूर करण्यात येते. 

  • अर्जदार विद्यार्थ्यांची 11 वी व 12 वी मध्ये नियमित हजेरी असणे आवश्यक असेल.  



राजश्री छत्रपती  शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना लागणारी कागदपत्रे 

 rajarshri chhatrapati shahu maharaj merit scholarship yojana important documents 

  • विद्यार्थ्यांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र
  • विद्यार्थ्यांची इयत्ता १०वी ची गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा दाखल प्रत
  • इयत्ता ११वी मध्ये प्रवेश घेतल्याची पावती


राजश्री छत्रपती  शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना अर्जप्रक्रिया 

 rajarshri chhatrapati shahu maharaj merit scholarship yojana 2024

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा



सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला राजश्री छत्रपती  शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेची rajarshri chhatrapati shahu maharaj merit scholarship yojana 2024 संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.







rajarshri chhatrapati shahu maharaj merit scholarship yojana 2024

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.