राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना State Government Open Merit Scholarship

state-government-open-merit-scholarship


State Government Open Merit Scholarship :-  नमस्कार विद्यार्थी मित्रहो आज या लेखामध्ये राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, लागणारी पात्रता, मिळणारी शिष्यवृत्ती आणि असणारी अर्जप्रक्रिया अशी संपर्ण माहिती पाहणार आहोत. 

मित्रहो तुम्हाला पण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य वाचा . 


ही योजना महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालय विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेसाठी एकूण 1208 संच शाखानिहाय मंजूर करण्यात आलेले आहेत. 


राज्यशासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना उद्देश 

State Government Open Merit Scholarship Purpose


  • विद्याथ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • विद्यार्थ्यांच्या मनात शक्षणाची रुची निर्माण करणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्तता करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनविणे.
  • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे.
  • कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये.
  • पैशाअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची गरज भासू नये.

राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना वैशिष्ट्य 

State Government Open Merit Scholarship Speciality

  •  या योजनेमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनतील त्यांना पैशासाठी कोणावर ही अवलंबून राहायची गरज राहणार नाही. 
  • भरपूर विद्यार्थी ही आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत असतात अश्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. 
  • ही योजना महाराष्ट्र  शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालय विभागाकडून राबविण्यात आली आहे.
  • या योजनेनुसार मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.
  • या योजनेसाठी असणारी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन व सोपी करण्यात आली आहे ज्यामुळे अर्जदार विद्यार्थी ही घरी बसून मोबाईल आणि लॅपटॉप च्या सहाय्याने अर्ज करून शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू शकतील ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्हीपण बचत होतील. 
  • या योजनेचा लाभ मुलगा आणि मुलगी दोघेपण घेऊ शकणार आहेत.

राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना मिळणारे लाभ 
State Government Open Merit Scholarship Benifits


या योजनेसाठी एकूण 1208 संच शाखानिहाय खालीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेले आहेत. 



अ / क्र . 

शाखा 

निर्धारित संच 

01 

कला 

285 

02 

वाणिज्य 

230 

03 

विज्ञान 

638 

04 

विधी 

55 

एकूण 


1208 




शासन निर्णय दिनांक 05/08/2004 रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सादर योजनेसाठी प्रतिमाह 100 रु. याप्रमाणे दहा महिन्यांकरिता रक्कम रु. 1000/- शिष्यवृत्ती देण्यात येते. 

राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना लागणारी पात्रता 

State Government Open Merit Scholarship Eligibility

  • अर्जदार विद्यार्थी ही महाराष्ट्र राज्याची राहिवशी असणे अत्यावश्यक आहे. 
  • किमान 60% गुण इयत्ता बारावी मध्ये मिळविणे आवश्यक आहे. 
  • विज्ञान, कला, वाणिज्य आणि विधी या शाखांमधून पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज (नवीन / fresh ) करण्यास पात्र ठरतील.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शिक्षण घेत असणारे महाराष्ट्रामधील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. 

राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना नूतनीकरण पद्धत 

State Government Open Merit Scholarship Renewal Process


ही योजना नूतनीकरण करण्यासाठी खालील बाबी आवश्यक असणार आहेत. 


  • ही योजना समाधानकारक प्रगती , नियमित उपस्थिती आणि चांगली वर्तवणूक असेल तर विहित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत चालू राहील. 
  • योजना नूतनीकरण करण्यासाठी विद्यार्थ्याने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील application id चा उपयोग करावा. 


राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना लागणारी कागदपत्रे

State Government Open Merit Scholarship Necessary Documents


या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 


  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • रहिवाशी प्रमाणपत्र 
  • बोनफाईड सर्टिफिकेट 

राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना अर्जप्रक्रिया  
State Government Open Merit Scholarship Application Procedure


या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 


सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना State Government Open Merit Scholarship या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.



State Government Open Merit Scholarship


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.