सुकन्या समृद्धी योजना / sukanya samriddhi yojna in marathi

sukanya-samriddhi-yojna-in-marathi


नमस्कार मित्रहो आज आपण सुकन्या समृद्धी योजनेच्या बाबतीत परिपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता, अर्ज कुठे करायचा अश्याप्रकारची  संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत जर तुम्हालापण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे.


सुकन्या समृद्धी योजना संकल्पना


केंद्रसरकार आणि राज्यसरकार मुलींच्या विकास व कल्यानासाठी नेहमीच महत्वपूर्ण योजना राबवित असते त्यापैकी सुकन्या समृद्धी योजना ही एक योजना आहे.माननीय  पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवरी 2015 साली केंद्रसरकारच्या माध्यमातून “बेटी बचाओ बेटी पढाओ “ या अभियानाच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. 


       या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार कमीत कमी गुंतवणुकीमध्ये खासकरून मुलींसाठी पैसे बचत करून देणारी योजना राबवत आहे. ही योजना मुलींचे शिक्षण, आरोग्य, लग्न आणि त्यांच्या पूढील येणाऱ्या भविष्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे.


पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजना,सुकन्या समृद्धी खाते आणि sukanya wealth account अश्याप्रकारच्या नावाने देखील ही योजना ओळखली जाते. 


मुलीचे आई-वडील हे राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट खात्यामध्ये अकाऊंट उघडून मुलीच्या भविष्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मुलीसाठी बचत करू शकतात.


सुकन्या समृद्धी योजनेत प्रत्येक वर्षी  कमीत कमी २५०  रुपये व जास्तीत जास्त १.५ लाख रुपये ठेऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतो. सुकन्या योजनेमध्ये खाते उघडण्यापासून ते मुलीचे वय  २१ वर्ष होईपर्यंत जमा केलेली रक्कम मुलींच्या पालकांना देण्यात येते.  


सुरुवातीचे फक्त १५ वर्ष या खात्यामध्ये पैसे भरण्याची गरज आहे पूढील १५-२१ वर्ष या योजनेमध्ये पैसे भरायची गरज नाही.या योजनेमध्ये फक्त ३५.२७ टक्के इतकीच गुंतवणूक तुमची असते,बाकी 64.७३ टक्के रक्कम व्याजाच्या माध्यमातून देण्यात येते. फक्त २५० रुपये इतक्या कमी गुंतवणुकीमध्ये चांगला परतावा मिळवून देणारी ही एकमेव योजना आहे 


या योजनेचा प्रथम उद्देश राज्यातील मुलींचा सामाजीक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास साधने तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना येणाऱ्या भविष्यात सशक्त आणि आत्मनिर्भर बनविणे.  


नवीन महत्वपूर्ण माहिती 


पूर्वी एका कुटुंबातील केवळ २ मुलींना या योजनेचा लाभ घेता  येत होता, पण नवीन नियमामध्ये झालेल्या बदलानुसार एका कुटुंबातील ३ मुलीदेखील सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. 


सुकन्या समृद्धी योजना उद्देश 

The Purpose of Sukanya Samriddhi Yojna 



  • मुलींचा  सामाजिक, आर्थिक  विकास  साधण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  •   मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या  उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. 
  • मुलींचे होणारे बाल विवाह रोखण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. 
  •  मुलींचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. 
  • मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी  सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. 
  • मुलींना येणारे भविष्य सुरक्षित पद्धतीने जगता यावे या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे 
  • मुलींना येणाऱ्या भविष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. 
  •  मुलींचे सार्वभौमिक जीवनमान सुधारण्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.


सुकन्या समृद्धी योजनेचे वैशिष्ट्ये

The Features of Sukanya Samriddhi Yojna 


  • राज्यातील सर्व मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे राबवण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना ही खूप महत्त्वाची योजना आहे.
  • मुलीचे वय वर्ष 21 होईपर्यंत या योजनेचा कालावधी  निर्धारित करण्यात आला आहे.
  • या योजनेमध्ये सुरुवातीच्या फक्त १५ वर्षे पर्यंतच पैसे जमा करायचे आहेत जरी या योजनेचा
  • कालावधी 21 वर्षे असेल.
  •  जर मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मुलीचे लग्न झाले तर त्या मुलीला सुकन्या समृद्धी योजनेमधून रद्द करण्यात येईल व ते खाते बंद करून त्या मुलीच्या पालकांना या योजनेचा लाभ भेटणार नाही. 
  • सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून जमा करण्यात येणाऱ्या रकमेवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही.
  • जर मुलीचे वय वर्ष २१  होऊन सुद्धा आई-वडील या योजनेच्या बचत खात्यामधून पैसे काढत नसतील तर जमा असेल त्या रकमेवर सुद्धा व्याज देण्यात येईल. 
  • फक्त पन्नास टक्के रक्कम  ही मुलीचे वय वर्ष 18 पूर्ण झाल्यावर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून काढता येतील. 
  • सुकन्या समृद्धी योजना खाते सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षी कमीत कमी 250 रुपये भरणे बंधनकारक आहे जर ठेवले नाही तर खाते  जितके वर्ष बंद राहील त्या प्रत्येक वर्षाला 50 रुपये दंड पुन्हा खाते सुरू करण्यासाठी  दयावा लागेल. 
  • सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या अर्जदार मुलीचा काही कारणामुळे मृत्यू झाल्यास जमा झालेली रक्कम व्याजासकट   अर्जदार मुलीच्या पालकांना देण्यात येते. 


सुकन्या समृद्धी योजना लाभार्थी

 The Benifiticary of Sukanya Samriddhi Yojna 


महाराष्ट्र राज्यातील 21  वर्षापेक्षा कमी वय  असणाऱ्या सर्व जातीतील मुली या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. 


सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे

The Benifits of Sukanya Samriddhi Yojna 


  1. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून मुलींचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. 
  2.  या योजनेच्या माध्यमातून अर्जदार मुलीला चांगल्या प्रकारचा व्याजदर  मिळणार आहे. 
  3. सुकन्या समृद्धी योजना ही एक कमीत कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारी बचत ठेव योजना आहे. 
  4. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सरकार पैशाची हमी घेते आणि त्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता नाही. 
  5. मुलीचे शिक्षण, आरोग्य लग्न आणि पुढील येणाऱ्या भविष्यासाठी ही खूप चांगली बचत योजना ठरणार आहे. 
  6. देशातील कोणीही जातीतील प्रत्येक मुलीला सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो. 
  7. कोणतीही  राष्ट्रीयकृत बँक किंवा पोस्ट ऑफिस यांच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडवून अर्जदार मुलीला या योजनेचा लाभ घेता येतो. 
  8. अर्जदार मुलीने जमा केलेल्या रकमेवर चक्रवाढ  व्याजदर मिळतो. 
  9. सदरील योजनेचा कालावधी २१  वर्षे असला तरी  अर्जदार मुलीला फक्त  १५  वर्षापर्यंतच पैसे भरावे लागणार आहेत बाकी १५  ते २१  वर्षे पैसे भरण्याची गरज नाही. 
  10. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून आयुर्विमा महामंडळातर्फे  राबवल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा या योजनेतर्फे सदर अर्जदार मुलीच्या नावावर जमा करत असलेल्या रकमेतून फक्त१००  रुपये प्रत्येक वर्षाला जमा करून सदर अर्जदार मुलीच्या कमावणाऱ्या पालकाचा विमा भरला जातो त्यामुळे जर पालकाचा अपघात किंवा अकाली मृत्यू झाल्यास अर्जदार मुलीच्या वारसाला कमीत कमी 30000 ते 75000 रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्यात येते. 
  11. आम आदमी विमा योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या शिक्षा सहयोग योजनेतर्फे अर्जदार मुलीला 600 रुपये शिष्यवृत्ती प्रत्येक सहा महिन्यासाठी आठवी नववी दहावी अकरावी आणि बारावी या इयत्तेत शिक्षण घेत असताना देण्यात येते. 
  12.  दत्तक घेतलेली अनाथ मुलगी पण सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्र ठरणार आहे. 

सुकन्या समृद्धी योजना नुकसान

The Disadvantages of Sukanya Samriddhi Yojana 


  • सुकन्या समृद्धी योजनेमध्ये करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीचा कालावधी फार जास्त आहे म्हणजे २१ वर्ष. 
  • या योजणेत  देण्यात येणारा व्याजदर ७.६ टक्के आहे त्यामुळे इतकी जास्त वर्ष गुंतवणूक करून सुद्धा येणारा परतावा हा शेयर मार्केट किंवा म्युच्युअल फंड च्या तुलनेत खूप कमी आहे . 
  • सदरील योजनेचा लाभ घेत असलेल्या मुलीचे लग्न २१ वर्षाच्या मध्ये झाले तर त्या मुलीला या योजनेचा लाभ घेत येत नाही आणि तिला या योजनेतून काढून टाकण्यात येते. 
  • या योजनेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक १.५ लाखच आहे यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर त्या रक्कमेवर व्याज दिला जात नाही. 


सुकन्या समृद्धी योजना पात्रता 

The Eligibility of Sukanya Samriddhi Yojna 


  • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे जरूरी आहे.


सुकन्या समृद्धी योजना अटी 

Rules of Sukanya Samriddhi Yojna 


  • अर्जदार मुलगी ही १० वर्षाखालील असावी म्हणजेच जन्मापासून ते १० वर्षापर्यंत वय असणारी मुलगी या योजनेसाठी पात्र असेल. 
  • जर एखाद्या परिवारामध्ये दोन मुली असतील आणि प्रत्येक मुलीला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक मुलीच्या नावावर वेगवेगळे खाते काढून या योजनेच्या लाभ घेऊ शकतील. 
  • जर एखाद्या महिलेला जुळ्या किंवा तीळ्या मुली झाल्या असतील तर त्या मुलींना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • २१  वर्षे पूर्ण झाल्यानंतर जमा रक्कम व्याजासकट पालकांना सोपवून सदरील खाते बंद करण्यात येते.
  •  जर मुलीचे नाव ठेवले नसेल तर आईच्या नावावर खाते उघडले जाते व नंतर नाव बदलू शकता.
  • फक्त मुलींसाठी ही योजना राबविण्यात आली आहे.


कोणत्या परिस्थितीत सुकन्या समृद्धी योजना खाते बंद करण्यात येते

In Which Situation Sukanya Samriddhi Yojana will be Discontinued 



  • सुकन्या समृद्धी खाते उघडून कमीत कमी ५ वर्षे झाल्यानंतर सदरील खाते बंद करता येते
  • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी मुलीचा मृत्यू झाल्यास सदरचे खाते बंद होऊ शकते.
  • लाभ घेत असलेल्या मुलीचे पालक मृत्यू झाले तर सदरील योजना बंद करता येते.
  • अर्जदार मुलीला जर एखादी उपचार न होऊ शकणारा आजार झाला असेल तर हे खाते बंद करता येऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजनेचे जुने व्याजदर


    सदरील वर्ष

  मिळणारा व्याजदर 

      मार्च २०१५ 

९.१ 

      मार्च २०१६ 

९.२ 

      सप्टेंबर २०१६ 

८.६ 

      मार्च २०१७ 

८.५ 

      जून २०१७ 

८.४ 

      डिसेंबर २०१७ 

८.३ 

      सप्टेंबर २०१८ 

८.१ 

      जून २०१९ 

८.५ 

      मार्च २०२० 

८.४ 

      डिसेंबर २०२१ 

७.६ 



सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

Require Documents of Sukanya Samriddhi Yojana 


  1. मुलीचा  जन्म दाखला
  2.  पॅन कार्ड
  3.  आधार कार्ड 
  4.  मतदान कार्ड ओळखपत्र 
  5.  राशन कार्ड
  6.  विज बिल
  7.  मुलीचा आणि आई-वडिलांचा फोटो
  8.  रहिवासी प्रमाणपत्र


मुलीच्या आई-वडिलांचे काही कागदपत्रे असणे जरुरी आहे जर एखाद्या मुलीचे आई-वडील नसतील तर सदर मुलीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्र असणे बंधनकारक आहे.


सुकन्या समृद्धी योजनेचे कॅल्क्युलेशन

Calculation of Sukanya Samriddhi Yojana


वर्ष

सुरुवातीची रक्कम

जमा करत असलेली रक्कम

  व्याज

फायनल रक्कम

१ 

        ०० 

      ५००० 

    ३८० 

    ५३८० 

२ 

      ५३८० 

      ५००० 

    ७८९ 

    १११६९ 

३ 

    १११६९ 

      ५००० 

    १२२९ 

    १७३९८ 

४ 

    १७३९८ 

      ५००० 

    १७०२ 

    २४१०० 

५ 

    २४१०० 

      ५००० 

    २२१२ 

    ३१३१२ 

६ 

    ३१३१२ 

      ५००० 

    २७६० 

    ३९०७१ 

७ 

    ३९०७१ 

      ५००० 

    ३३४९ 

    ४७४२१ 

८ 

    ४७४२१ 

      ५००० 

    ३९८४ 

    ५६४०५ 

९ 

    ५६४०५ 

      ५०००

    ४६६७ 

    ६६०७१ 

१० 

    ६६०७१ 

      ५००० 

    ५४०१ 

    ७६४७३        

११ 

    ७६४७३ 

      ५००० 

    ६१९२ 

    ८७६६५ 

१२ 

    ८७६६५ 

      ५००० 

    ७०४३ 

    ९९७०७ 

१३ 

    ९९७०७ 

      ५०००

    ७९५८ 

    ११२६६५ 

१४ 

    ११२६६५ 

      ५००० 

    ८९४३ 

    १२६६०७ 

१५ 

    १२६६०७ 

        0000 

    ९६२२ 

    १३६२३० 

१६ 

    १३६२३० 

        0000 

    १०३५३ 

    १४६५८३ 

१७ 

    १४६५८३ 

        0000 

    १११४० 

    १५७७२३ 

१८ 

    १५७७२३ 

        0000 

    ११९८७ 

    १६९७१० 

१९ 

    १८२६०८ 

        0000 

    १२८९८ 

    १८२६०८ 

२० 

      १८२६०८ 

        0000 

    १३८७८ 

      १९६४८७ 

२१ 

      १९६४८७ 

        0000

    १४९३३ 

      २११४२० 


५०००  जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत प्रत्येक वर्षाला गुंतवणूक केल्यास १४  वर्षांनी ७.६% व्याज दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने १२६६०७  इतकी रक्कम भेटेल आणि २१ वर्षाला एकूण २११४२० रुपये भेटतील. 


या योजनेमध्ये तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा मिळेल 21 वर्षानंतर. 


सुकन्या समृद्धी योजनेमध्ये समावेश असणारे राष्ट्रीयकृत बँकांची नावे 

 Bank list of Sukanya Samriddhi Yojana


यापैकी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सुकन्या समृद्धी योजनेसाठी बँक खाते उघडता येते. 


  • Indian Overseas Bank
  •  Indian Bank
  •  ICICI Bank
  •  IDBI Bank
  •  Dena Bank
  •  Corporation Bank
  •  Central Bank of India
  •  Canara Bank
  •   Bank of Maharashtra
  •  Oriental Bank of Commerce
  •  Punjab National Bank
  •  UCO Bank
  •  United Bank of India
  •  Vijaya Bank
  •  State Bank of Bikaner and Jaipur
  •  State Bank of Hyderabad
  •  State Bank of India
  •  Andhra Bank
  •  Bank of Baroda
  •  Punjab and Sind Bank
  • Syndicate Bank
  •  Union Bank of India
  •  State Bank of Patiala
  •  State Bank of Travancore
  •  State Bank of Mysore
  •  Allahabad Bank
  •  Axis Bank
  •  Bank of India


सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे


  1. अर्ज करणारी मुलगी महाराष्ट्र राज्याची नसेल तर अर्ज रद्द होईल. 
  2.  अर्ज करणाऱ्या मुलीने अर्जामध्ये खोटी माहिती भरली असेल तर अर्ज रद्द होईल. 
  3.  अर्ज करणाऱ्या मुलीचे वय दहा वर्षापेक्षा जास्त असेल तर अर्ज रद्द होईल


सुकन्या समृद्धी योजना पीडीएफ माहिती

PDF of Sukanya Samriddhi Yojana


सुकन्या समृद्धी योजनेची माहिती पीडीएफ मध्ये येथून घेऊ शकता. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी कोणतीही राष्ट्रीयकृत बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज उपलब्ध आहेत परंतु तुमच्या माहितीसाठी येथून अर्ज डाऊनलोड करू शकता. 



सुकन्या समृद्धी योजना अर्ज

क्लिक करा 

सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस अर्ज

क्लिक करा 

सुकन्या समृद्धी योजना पीडीएफ माहिती

क्लिक करा 

Axis bank सुकन्या समृद्धी योजना अर्ज

क्लिक करा 



सुकन्या समृद्धी योजनेसाठी बँकेत अर्ज करण्याची आणि खाते उघडण्याची पद्धत

Account opening procedure of Sukanya Samriddhi Yojana 


  • तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसच्या शाखेमध्ये जा.
  • तुम्ही अर्ज डाऊनलोड केला असेल तर तो अर्ज किंवा शाखेमधील सुकन्या समृद्धी योजना चा अर्ज घ्या.
  •  अर्जामध्ये आवश्यक असेल ती माहिती भरा आणि मागितलेली  कागदपत्रे जोडा.
  • कमीत कमी २६०  आणि जास्तीत जास्त १.५ लाख पेक्षा कमी यापैकी तुम्हाला जी रक्कम भरायची असेल ती अर्जामध्ये आणि स्लिप मध्ये लिहा. 
  •  तुमचा अर्ज आणि रक्कम जमा करा, अर्ज आणि रक्कम जमा केल्यानंतर तुम्हाला त्याची पावती देण्यात येईल आणि तुमच्या मुलीच्या नावे खाते चालू करण्यात येईल. 
  •  या खात्याचे तुम्हाला पासबुक सुद्धा देण्यात येईल. 

 सुकन्या समृद्धी योजनेच्या बाबतीत विचारले जाणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न

Mostly asked questions of Sukanya Samriddhi Yojana


सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कमीत कमी किती रुपये भरू शकतो?
      उत्तर- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कमीत कमी २५०  रुपये प्रत्येक वर्षाला भरू  शकतो. 

      २.  सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जास्तीत जास्त किती रुपये भरू शकतो?
      उत्तर- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जास्तीत जास्त १.५लाख रुपये रक्कम भरू शकतो.  

      ३. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये रक्कम ठेवण्याचा कालावधी किती आहे?
       उत्तर- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये रक्कम ठेवण्याचा कालावधी २१ वर्षाचा आहे. 

       ४. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये रक्कम २१ वर्षाच्या अगोदर कधी  काढता येते?
       उत्तर- मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा मुलीला जर कोणता आजार झाला असेल तर मुलीचे वय १८वर्षे पूर्ण     
                 झाल्यानंतर ५० टक्के रक्कम काढता येते.   

        ५. या समृद्धी योजनेमधील खाते बंद झाले तर किती दंड करण्यात येईल?
        उत्तर- सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद झाल्यास जितके वर्षे खाते बंद राहील त्या प्रत्येक वर्षाला ५० रुपये
                 दंड खाते सुरू करते वेळेस भरावा लागेल. 

         ६. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये ऑनलाईन खाते उघडता येते का?
          उत्तर- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये ऑनलाईन खाते उघडण्याची सोय नाही त्यासाठी तुम्हाला नजीकच्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेला भेट द्यावी लागेल. 

सारांश


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.





                                                            sukanya samriddhi yojna in marathi 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.