ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 - 2024 / tractor anudan yojna 2023 - 2024

tractor-anudan-yojna-2023-2024


tractor anudan yojna 2023 - 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, आज आपण ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या बाबतीत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता, मिळणारे अनुदान, अर्ज कसा करायचा अशा प्रकारची  संपूर्ण माहिती आपण आज या लेखामध्ये पाहणार आहोत.  तुम्हाला पण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा. 

 प्रामुख्याने शेती हा महाराष्ट्र राज्यातील प्रमुख व्यवसाय आहे. मात्र शेतीच्या कामासाठी  मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे शेतीची कामे वेळेवर होत नाहीत आणि शेतीची कामे वेळेवर न झाल्यामुळे, शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.  उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर होत आहे आणि त्यामुळे शेती हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खडतर बनत आहे.2023 - 2024 या काळामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. शेतीसाठी लागणारा इतर खर्च कमी करून शेतीचे उत्पादन वाढवायचे असेल तर पारंपरिक शेतीची पद्धत बदलून आधुनिक यांत्रिकीकरनादधारे शेती करणे गरजेचे आहे. त्यासाठी पेरणी आणि काढणीनंतर प्रक्रियेचे यांत्रिकीकरण करणे आवश्यक आहे. नवीन यांत्रिकीकरणाचा जास्त प्रमाणावर वापर केल्यामुळे कृषि उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणे शक्य होईल.  


महाराष्ट्र सरकार हे नेहमी कृषि यांत्रिकीकरणाला महत्व देत असते. कृषि क्षेत्रात मध्ये यांत्रिकीकरण वाढावे या उद्देशाने राज्यासरकार दरवर्षी MahaDBT Portal च्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक खूप महत्वाची योजना जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप फायद्याची आहे ती म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेनुसार शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार कृषि अवजारांवर अनुदान देते. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना खालील गोष्टींवर अनुदान दिले जाते व यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. 

 

ही योजना राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान देणे आणि कृषि क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढवून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राबविण्यात येत आहे.




ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी काही महत्त्वाच्या बाबी

tractor anudan yojna 2023 - 2024

या योजनेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टीच्या बाबतीत लक्ष द्यावे लागणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एका अवजारासाठी अर्ज करता येईल म्हणजेच तुम्ही फक्त ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर साठी लागणारे अवजारे यापैकी कोणत्याही एका अवजारासाठी अर्ज करू शकणार आहेत जर अर्जदार शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असेल आणि त्याला ट्रॅक्टर साठी लागणारे अवजारासाठी अनुदान पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्याला अर्ज करते वेळेस त्याच्याजवळ ट्रॅक्टर असल्याचा पुरावा जोडणे आवश्यक्य राहणार आहे. 


ट्रॅक्टर अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे, तसेच Maha DBT फार्मर पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजना देखील राबविण्यात येत आहे.  महाडीबीटी पोर्टलवर केंद्र सरकारच्या 60%  आणि राज्य सरकारच्या कृषी यंत्रिकीकरणाच्या 40% सहभागासह अनेक योजना लागू केल्या जात आहेत. महाडीबीटी पोर्टलवर लागू केलेली अनेक कृषी यंत्रे तुम्ही खालील प्रमाणे योजनेमध्ये समाविष्ट करू शकता. 

ट्रॅक्टर अनुदान योजना उद्दिष्ट 

Tractor anudan yojna Purpose 


  1. राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे
  2. कमीत कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीयांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे 
  3. राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधने 
  4. राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिकरित्या सशक्त व आत्मनिर्भर बनविणे 
  5. ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीच्या सुधारणेसाठी औजारे / यंत्र, पूर्वमशगत औजारे, आंतर्मशागत यंत्र, पेरणी व लागवड यंत्रे, पीक संरक्षण यंत्र, काढणी व मळणी अवजारे ही सर्व शेतीची कामे जलद गतीने करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. 
  6. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी  महाराष्ट्र सरकार सदैव तत्पर असते आणि त्यामुळे  शेतकऱ्यांसाठी नेहमी विविध कल्याणकारी योजना राबवित असते. भरपूर शेतकरी असे आहेत जे अजूनही पारंपरिक पध्दतीने शेती करतात आशा पारंपरिक पध्दतीने शेती करण्यासाठी भरपूर वेळ लागतो म्हणून महाराष्ट्र राज्यसरकारने शेतकऱ्यांची शेती विषयक कामे आधुनिक पध्दतीने आणि आधीक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.  

ट्रॅक्टर अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

Tractor Anudan Yojna Charactorstics 


  1. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण योजनांपैकी ही एक योजना आहे
  2. या महत्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक व उपयुक्त असणारी अवजारे विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. 
  3. या योजनेच्या माध्यमातून अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असल्यामुळे अर्जदार शेतकरी हे घरी बसून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून योजनेसाठी अर्ज करू शकतील त्यामुळे अर्जदार शेतकऱ्यांना कुठल्या सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसे दोन्ही गोष्टींची बचत होईल
  4. या योजनेच्या माध्यमातून  अर्जदार शेतकऱ्यांना मिळणारी जी रक्कम असेल ती त्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येईल

महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून  खालील कृषी यंत्रे / अवजारे खरेदीसाठी शेतकरी लाभ घेऊ शकतील 


  •  पॉवर टिलर
  •  ट्रॅक्टर /  पॉवर टिलर चलित अवजारे 
  • बैल चलित अवजारे / यंत्रे 
  • मनुष्य चलित यंत्र / अवजारे 
  • स्वयंचलित डिवाइस 
  • अद्वितीय मशीन टूल्स
  • बागायती यंत्रे / अवजारे
  • मानवी शक्तीवर  शक्तीवर चालणारी यंत्रे / अवजारे 
  • काढणी पश्चात तंत्रज्ञान 
  • फलोत्पादन यंत्र / अवजारे 
  • वैशिष्ट्यपूर्ण यंत्र / अवजारे 

ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून यंत्रांसाठी व अवजारांसाठी मिळणारे अनुदान 

  1. ट्रॅक्टर 
  2. पॉवर टिलर 
  3. बैलचलित अवजारे / यंत्रासमग्री 
  4. मानवी शक्तीवर चालणारी यंत्रे . अवजारे 
  5. प्रक्रिया सेट 
  6. काढणीनंतरचे तंत्रज्ञान 
  7. बागायती यंत्रे / अवजारे 
  8. विशेष यंत्रे / अवजारे 
  9. स्वयंचलित मशीन


ट्रॅक्टर अनुदान योजना लाभार्थी 

  • महाराष्ट्र राज्यामधील सर्व जाती धर्मातील शेतकरी ट्रॅक्टर अनुदान या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. 


ट्रॅक्टर अनुदान योजनेचे फायदे 

tractor anudan yojna 2023 - 2024

  1. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या आवडीने ट्रॅक्टर खरेदी करू शकणार आहेत 
  2. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना 50% अनुदान देणार आहे 
  3. तसेच या योजनेच्या माध्यमातून राज्य शासन खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40%अनुदान देणार आहे 
  4. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला बँकांकडून किंवा संस्थांकडून कमी व्याजदरात कर्जाची सुविधा देण्यात येणार आहे 
  5. या योजनेच्या माध्यमातून देशतील कोणताही नागरिक लाभ घेऊ शकणार आहे 
  6. महिला शेतकऱ्यांना या योजणेसाठी  प्राथमिक स्थान देण्यात येणार आहे
  7. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल 
  8. या योजणेमुळे शेतीची कामे कमी वेळेत आणि जलद गतीने लवकर होण्यासाठी खूप मदत होईल 
  9. या योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या तर्फे शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते 


महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीच्या मशागतीसाठी खालील यंत्र / अवजारांच्या खरेदीसाठी लाभ घेत येणार आहे


  • पॉवर डटलर
  • क्विटर पॉवर डटलर चडलत
  • औजारे
  • 29 बीएचपी पेक्षा कमी नांगर
  • वखारमोल्ड
  • बोडडनांगर

पूर्व मशागत जमीन सुधारणा अवजारे 

  1. तव्याचा नांगर

  2. चीजल नांगर, वखर

  3. पॉवर, वखर, बांड फॉमडर

  4. क्रष्ट ब्रेकर, पोस्ट होल डगर लेव्हलर ब्लेड

  5. कल्टिव्हेटर (भोगडा)

  6. रोटोकल्टिव्हेटर

  7. डवड स्लॅशर

  8. रीजर, रोटो पडलर

  9. केज व्हील

  10. बटाटा प्लांटर पूर्वमशागत


आंतर मशागत यंत्र

  1. ग्रास डवड स्लॅशर

  2. फरो ओपनर

  3. पॉवर डवडर (2 बीएचपी पेक्षा कमी इडज चडलत) 



पेरणीआणि  लाकडी यंत्रासाठी अर्थसहाय्य

  1. रेज्ड बेड प्लांटर
  2. न्युमॅडटक प्लांटर
  3. न्युमॅडटक व्हेडजटेबल, सीडर,रेज्ड बेड प्लांटर इनक्लाईन प्लेट व शेपर अटॅचमेंट
  4. न्युमॅडटक व्हेडजटेबल ट्रान्सप्लांटर
  5. पेरणी यंत्र / बियाणे खत पेरणी यंत्र (5 फण)
  6. बीज प्रक्रिया डिम
  7. ट्रिक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर (एअरकॅरअर / एअर अडसस्ट)


पीकाच्या संरक्षनासाठी उपयुक्त असणारी अवजारे 

  1. ट्रिक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर (बूम टाईप)
  2. ट्रिक्टर ऑपरेटेड इलेक्ट्रिस्टॅडटक स्प्रेअर
  3. ट्रिक्टर ड्रिन ररपर

काढणी आणि मळणी अवजारे

  • ररपर कम बाईडर
  • कांदा काढणी यंत्र
  • भुईमूग शेंगा तोडणी यंत्र
  • बटाटा काढणी यंत्र
  • भुईमूग काढणी यंत्र
  • मस्ट चांग यंत्र, प्लास्टिक मस्ट
  • स्टी ररपर
  • राईस स्टी ररपर
  • उस पाचट कुट्टी
  • कडबा कुट्टी
  • कोकोनट फ्रडां चॉपर
  • स्टबल शेव्हर
  • मोवर
  • मोवर श्रेडर
  • प्लायल हारव्हेस्टर
  • बहुपीक मळणी यंत्र
  • भात मळणी यंत्र
  • उफणणी पंखा
  • मका सोलणी यंत्र
  • मोल्ड बोडनांगर


ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लागणाऱ्या अटी आणि पात्रता 

  • एक शेतकरी हा एक ट्रॅक्टर साठीच पत्र असणार आहे. 
  • अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 
  • या योजेच्या माध्यमातून फक्त एकाच यंत्राचा  / अवजारचा लाभ घेता येऊ शकणार आहे म्हणजेच राज्य सरकार फक्त एक अवजारसाठी अनुदान देणार आहे. 
  • अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:चे आधारकार्ड असणे जरूरी आहे. 
  • अर्जदार शेतकाऱ्याच्या कुटुंबामध्ये जर ट्रॅक्टर असेल तर अर्जदार हा ट्रॅक्टर साठी लागणाऱ्या अवजारांसाठी पात्र समजला जातो, यासाठी ट्रॅक्टरच्या मालकीचे कागदपत्र असणे आवश्यक आहे. 
  • जर एखाद्या अर्जदार शेतकाऱ्याने या योजनेच्या माध्यमातून अवजारचा लाभ घेतला असेल तर तो शेतकरी त्याच अवजारचा लाभ परत घेण्यासाठी 10 वर्षानंतर अर्ज करू शकतो. 
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे शेती असणे जरूरी आहे. 
  1. अर्जदार शेतकाऱ्याचे वय 18 वर्ष असणे जरूरी आहे. 

  2. जर एखाद्या अर्जदार शेतकाऱ्याने या आधी कोणत्याही कृषी अनुदान योजनेचा लाभ घेतला असेल तर सदर शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. 

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

 tractor anudan yojna documents 

  1. ट्रॅक्टर अनुदान योजनेची कागदपत्रे
  2. आधार कार्ड
  3. 7/12 उतारा 8 अ दाखाला 
  4. अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र
  5. अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा.
  6. स्व-घोषणा
  7. राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
  8. पूर्व संमती पत्र
  9. पासपोर्ट आकाराचा फोटो
  10. खरेदी करावयाच्या उपकरणांचे कोटेशन.
  11. केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने जारी केलेले उपकरण तपासणी अहवाल


ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची अर्ज प्रक्रिया 

या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही माध्यमातून अर्जदार अर्ज करू शकनार आहे. 


ट्रॅक्टर अनुदान योजना ऑफलाइन अर्जप्रक्रिया 


खालील प्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज सादर करू शकता. 


  1. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या क्षेत्रातील जिल्हा कृषी विभाग कार्यालयाला द्या 
  2. कार्यालयातून ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लागणारा अर्ज घ्या. 
  3. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या आणि योग्य ती कागदपत्रे जोडून अर्ज कृषि अधिकाऱ्यांकडे सादर करा. 


                    अश्याप्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता. 


ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 


या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रॅक्टर योजनेच्या बाबतीत विचारले जाणारे काही महत्वपूर्ण प्रश्न 


  1.  ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून किती अनुदान दिले जाते ? 

उत्तर :ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून राज्यसरकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50% अनुदान देते व खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40% अनुदान देते. 


      २ ) ट्रक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ? 

          उत्तर: ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. 


      3) ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून कोण कोणत्या अवजारांसाठी अनुदान मिळते ? 

           उत्तर: ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून पुढील अवजारांसाठी  अनुदान मिळणार आहे.

           अंतर्गतजमीन मशागत यंत्र, जमीन सुधारणा पूर्वमशागत अवजारे, आंतर मशागत यंत्र पेरणी व    

            लागवड यंत्रे, पीक संरक्षण अवजारे,  काढले व मळणी अवजारे.



सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान  योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.



                                                     tractor anudan yojna 2023 - 2024


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.