राज्यसरकारचा मोठा निर्णय आता मुलींना मिळणार मोफत शिक्षण

free-education-for-girl-in-maharashtra


Free Education For Girl In Maharashtra :- नमस्कार मित्रहो, दि 09/02/2024 रोजी नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन करण्यासाठी माननीय शिक्षणमंत्री श्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्या प्रसंगी उपस्थित असणारे शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी त्यांनी संवाद साधला, आणि मुलींना आता शिक्षण मोफत मिळणार ही मुलींच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी घोषणा केली. 


या योजणेमुळे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल आजही महाराष्ट्रातील कित्येक मुली या उच्च शिक्षणापासून वंचित राहतात अश्या मुलींसाठी ही योजना वरदान ठरणारच आहे. Free Education For Girl In Maharashtraमित्रहो या लेखामध्ये आम्ही या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पुरवली आहे. या योजनेचा तुमच्या परिवारातील मुलींना लाभ मिळवून द्या तसेच तुमच्या परिसरातील ज्या मुलींना या योजनेची माहिती नाही अश्या मुलींना पण या योजनेचा लाभ घेण्यास मदत करा. जेणेकरून ते पण उच्चशिक्षित होतील. 


या कार्यक्रमामध्ये पाटील म्हणाले राज्यातील सर्व मुलींना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीय, अश्याप्रकारच्या इतर 600 हून अधिक अभ्यासक्रमांना जून 2024 पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही, अश्याप्रकारची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली. 


पाटील यांनी भाषणास सुरुवात करण्यापूर्वी तेथील उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांशी त्यांचे प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपात मांडण्यास सांगितले होते त्यावेळी जामणेर तालुक्यातील एक विद्यार्थ्याने गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त दारातील वसतिगृह व भोजन, कमी शुल्क, अशी सवलत मिळावी अशी मागणी केली. 


या उद्घाटन सोहळ्याला मंत्री श्री चंद्रकांत पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.



योजनेचे नाव 

मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 

विभाग 

उच्च व तंत्र शिक्षण विभाग 

राज्य 

महाराष्ट्र 

लाभ 

मोफत शिक्षण 

वर्ष 

2024-25 


या योजनेनुसार जून 2024 पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी कुठलेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. ही जवळपास 800 अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू राहणार आहे. 


या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 

Free Education For Girl In Maharashtra Documents 

  • आधार कार्ड 

  • डोमसाईल प्रमाणपत्र 

  • उत्पन्न प्रमाणपत्र ( दाखला )

  • शाळा सोडल्याचा दाखला 

  • मार्कशीट 

  • पासपोर्ट साइज फोटो 


या योजनेसाठी लागणारी पात्रता 

Free Education For Girl In Maharashtra Eligibility 

  • मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलीटेक्निक अश्याप्रकारच्या 800 हून अधिक अभ्यासक्रमांचा लाभ एक रुपयाही न भरता मिळविता येणार आहे. 

  • फक्त महाराष्ट्रातील मुलीच या योजनेसाठी पात्र असणार आहेत. 

  • ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असेल फक्त त्याच पालकांच्या मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतील. 

  • या योजनेचा लाभ केवळ मुळीच घेऊ शकतील. 


सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला मुलींसाठी मोफत शिक्षण योजना Free Education For Girl In Maharashtra या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.