मागेल त्याला सौर कृषी पंप योजना / Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024

 magel-tyala-krushi-pump-yojana-2024


Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024 :- नमस्कार मित्रहो, काल सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये माननिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली त्यापैकीच एका योजनेच्या बाबतीत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 


शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी दिवसा विजेच्या अनियमिततेमुळे पिकांना पाणी देण्यासाठी मुबलक पाणीपुरवठा करता येत नाही  त्यामुळे कित्येक शेतकरी इंजिनच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी पुरवठा करतात परंतु डिझेल च्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी इंजिनच्या मध्यमातून पण पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहेत या सर्व बाबींचा विचार करून राज्यसरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत कल्याणकारी अशी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही अत्यंत महत्वपूर्ण योजना राबविण्यात येणार आहे. चला तर मग मित्रहो पाहुयात या योजनेसाठी लागणारी संपूर्ण माहिती. 


मित्रहो, या योजनेची संपूर्ण माहिती आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला सांगितली आहे या योजनेसाठी लागणरी कागदपत्रे, पात्रता काय असणार आहे, अनुदान किती मिळणार आहे, कोण कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत, अर्जप्रक्रिया कशी असणार आहे अशी संपूर्ण माहिती सांगितली आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा तसेच तुम्हाला जे शेतकरी गरजू आहेत असे वाटते अश्या शेतकऱ्यांना अवश्य शेअर करा जेणेकरून ते शेतकरी पण या योजनेचा लाभ घेऊ शकतील. 


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेनुसार मिळणारे अनुदान 

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024

7 हजार  मेगाव्हॅट सौर ऊर्जा बनविण्याचे लक्ष्य गाठविण्यासाठी ही योजना “मुख्यमंत्री सौर रुची वाहिनी योजना 2 “ अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या योजणेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनुसार 8 लाख 50 हजार नवीन सौर कृषीपंप बसविण्यात येणार आहेत. यापूर्वी 78 हजार 757 पंप हे पीएम कुसूम योजनेमार्फत बसविण्यात आले आहेत 1 लाख कृषी पंप बसविण्याचे पीएम कुसूम योजनेचे यावर्षीचे उद्दिष्ट आहे.   


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेविषयी थोडक्यात माहिती 

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Some Information 

काल विधानसभेमध्ये राज्याचे अर्थमंत्री श्री अजित दादा पवार यांनी राज्याचा अंतरिम बजेट सादर केला, यावेळी त्यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी काय - काय योजना राबविण्यात येणार आहेत, तसेच या योजणांसाठी किती खर्चाची तरतूद ही राज्य सरकार आपल्या तिजोरीतून करणार आहे याच्या बाबतीत सविस्तर माहिती दिली. राज्यसरकार या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोण कोणते योजना राबवेल याकडे सर्व जनतेचे लक्ष होते कारण शिंदे सरकारचा हा यावर्षीचा शेवटचा अर्थसंकल्प होता कारण पुढील सह महिन्यानंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. शेवटी काल अजित दादा पवार यांनी  अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आणि शेतकऱ्यांसाठी विविध विभागांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती पण यावेळी दिली. 


खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ  1245 महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करुन विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झालेल्या 44 लाख 82 हजार शेतकऱ्यांना 3825 कोटी रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आलेली आहे. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता जुलै 2022 पासून 12769 कोटींची मदत देण्यात आलेली आहे. 2024-25 वर्षासाठी मदत-पुनर्वसन विभागास 668 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव नियोजित आहेत”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.



                                            Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.