मुख्यमंत्री वयोश्री योजना / Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi

mukhyamantri-vayoshri-yojana-in-marathi


Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi :- नमस्कार मित्रहो आज या लेखामध्ये आपण मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या बाबतीत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे, या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे. अश्याप्रकारची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. 

मित्रहो तुम्हालापण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा आणि तुमच्या सभोवताली असणाऱ्या वयस्कर व्यक्तींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अवश्य मदत करा. 


वयोश्री योजना ही आपल्यासाठी नवीन नाही पूर्वीपासूनच वयोश्री योजना ही केंद्रसरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत होती पण राष्ट्रीय वयोश्री योजना ही केवळ मोजक्याच जिल्ह्यामध्येच राबविण्यात येत होती. त्यामुळे बाकीच्या उरलेल्या जिल्ह्यातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हते या सर्व बाबींचा विचार करून राज्यसरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. चला तर पाहुयात या योजनेची संपूर्ण माहिती. 


ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे असे वयस्कर नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. 


काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना 

 Mukhyamantri Vayoshri Yojana Purpose

मित्रहो जस जसे व्यक्तीचे वय वाढत जाते तसे व्यक्तीला विविध प्रकारच्या बिमारी, व्याधी वाढत असतात, अपंगत्व येते, शरीरामधील शक्ति कमी होतो ज्यामुळे अशक्तपणा येतो. असे विविध आजार जर जडले तर अश्या आजारचे निराकरण करण्यासाठी वयस्कर व्यक्ती कडे पैस्याची कमतरता भासते कारण या वयामध्ये असे व्यक्ती काम करू शकत नाहीत कित्येक व्यक्ती हे वृद्धाश्रमा मध्ये राहत असतात या सर्व बाबींचा विचार करून या व्यक्तींना अश्या आजाराच्या निधानासाठी मदत व्हावी या हेतूने ही योजना राबविण्यात आलेली आहे. 


या योजनेनुसार जय वयस्कर नागरिकांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखांपेक्षा जास्त आहे अश्या नागरिकांना महिन्या 3000 म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये इतकी आर्थिक मदत करण्यात येते या पैश्याच्या माध्यमातून ते त्यांच्या आजारांचे निराकरण करू शकतात किंवा त्यांच्या आजाराच्या निराकारनासाठी उपयुक्त असणारी उपकरणे खरेदी करू शकतात. काही नागरिकांना ऐकायला येत नाही, काही नागरिकांना वयोमानामुळे दिसत नाही, तसेच काही नागरिकांना व्यवस्थित चालायला जमत नाही अश्या नागरिकांना उपकरणांची गरज भासते मिळणाऱ्या पैश्यांच्या माध्यमातून ते व्यक्ती ही उपकरणे खरेदी करू शकतात. अश्या काही उपयोगी पडणाऱ्या उपकरणांची माहिती आम्ही खाली दिलेली आहे. 


  • श्रवण यंत्र
  • फोल्डिंग वॉकर
  • लंबर बेल्ट
  • सर्वाइकल कॉलर
  • चश्मा
  • ट्राइपॉड
  • स्टिक व्हीलचेयर
  • कमोड चेयर
  • नि-ब्रेस इत्यादि 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेनुसार मिळणारे लाभ 

 Mukhyamantri Vayoshri Yojana Benefits 
  • या योजनेनुसार पात्र असणाऱ्या व्यक्तींना महिन्या 3000 इतकी आर्थिक मदत करण्यात येते. 
  • हा लाभ केवळ राज्यसरकार च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. 
  • या योजणेमुळे महाराष्ट्र राज्यातील जवळपास 15 लाख वृद्ध नागरिकांना आर्थिक मदत मिळणार आहे. 
  • या योजनेनुसार मिळणारा लाभ हा पात्र व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये (DBT च्या माध्यमातून ) डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात येत आहे ज्यामुळे नागरिकांची फसवणूक होणार नाही आणि यामुळे मिळणारा लाभ हा थेट पात्र नागरिक घेऊ शकणार आहेत. 
  • राज्यसरकार च्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन करण्यात आलेली आहे ज्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वृद्ध व्यक्तींना कुठेपण फिरायची गरज नाही ते आपल्या मोबाइल च्या माध्यमातून घरी बसून अर्ज करू शकणार आहेत. 
  • महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेसाठी  480 करोड रुपये इतके पैसे मंजूर केले आहेत. 
  • राष्ट्रीय वयोश्री योजना ही फक्त काही तुरळक जिल्ह्यामध्येच राबविण्यात येते पण महाराष्ट्र वयोश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. 

 मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी पात्रता 

 Mukhyamantri Vayoshri Yojana Eligibility 

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील सर्व वयोवृद्ध नागरिक घेऊ शकतील. 
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय हे 31 डिसेंबर 2023 नुसार 65 वर्ष किंवा यापेक्षा जास्त असेल हवे. 
  • अर्ज करण्यासाठी वृद्ध व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखांपेक्षा कमी असायला हवे. 
  • अर्जदार व्यक्तीकडे आधार कार्ड सोबत लिंक केलेला बँक खाता असायला हवा. 
  • या योजनेचा लाभ हा कमीत कमी 30% महिलांना होणे आवश्यक आहे.


मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 

 Mukhyamantri Vayoshri Yojana Important Documents

  • मतदान कार्ड 
  • कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते 
  • स्वघोषणा प्रमाणपत्र  
  • उत्पन्नाचा दाखला 
  • ज्येष्ठ नागरिक कार्ड प्रमाणपत्र 
  • मोबाइल नंबर 
  • पासपोर्ट साइज फोटोग्राफ ( 2 )


मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी असणारी अर्जप्रक्रिया 

 Mukhyamantri Vayoshri Yojana Application Procedure 

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही माध्यमातून अर्ज करू शकता. 


ऑफलाइन अर्जप्रक्रिया 

Offline Application Procedure

या योजनेचा अर्ज करण्यासाठी लाभार्थी संबंधित जिल्हा सामाजिक न्याय कार्यालयामध्ये अर्ज करावा लागेल. या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जमा करणे आवश्यक असेल. कागदपत्रांमध्ये वय प्रमानपत्र, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड या कागदपत्रांचा समावेश असणे आवश्यक राहील. 


अर्ज प्रक्रिया :-

 

  1. जिल्हा सामाजिक न्याय कार्यालयात जा. 

  2. संबंधित योजनेसाठी असणारा अर्ज घ्या. 

  3. अर्जमाधील माहिती व्यवस्थित भरून घ्या. 

  4. आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडा. 

  5. अर्ज जमा करा. 


ऑनलाइन अर्जप्रक्रिया

Online application Procedure

या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. 


सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजना Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.




Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.