पंतप्रधान सूर्य घर मोफत बिजली योजना ! अर्ज सुरू असा करा अर्ज / PM Surya Ghar Muft Bijli Yojana Maharashtra

pm-surya-ghar-muft-bijli-yojana-maharashtra


PM Surya Ghar Muft Bijli Yojana Maharashtra :- नमस्कार मित्रहो आज या लेखमध्ये आपण या लेखमध्ये PM सूर्य घर मोफत बिजली योजना या योजने विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, योजनेसाठी अर्ज कसा करायचा, मिळणारा लाभ किती असेल अश्या प्रकारची संपू र्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना भेटावी यासाठी ही योजना राबविली आहे या योजनेच्या माध्यमातून सौरउर्जेच्या प्रगतीला चालना मिळावी यासाठी अर्ज करण्याचे आव्हान पंतप्रधानांनी केले आहे, “पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना “ सुरू केली आहे, ही योजना गावोगावी पोहचविण्यासाठी , शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतीना त्यांच्या अधिकारक्षेत्रामध्ये रूफटॉप सोलार सिस्टिमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून एक कोटी सोलार पॅनल देण्यात येणार आहेत. 


शाश्वत विकास आणि लोक कल्याणासाठी ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून 75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक सरकार करत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दर महिना 300 युनिट्स पर्यंत मोफत बिजली पुरवठा देशातील 1 कोटी कुटुंबांना देण्यात येणार आहे. या योजनेच्या अनुदानात स्वरूपात मिळणारी धन राशी ही थेट लाभार्थी यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या योजणेतील सर्व संबंधित लाभार्थी यांना राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टल वर एकत्रित करण्यात येणार आहे, त्यामुळे ही योजना राबविण्यासाठी सरकारला सोयस्कर जाणार आहे. 


या योजनेला सर्व थरापर्यंत पोहचविण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतीना त्यांच्या अधिकार असणाऱ्या क्षेत्रांमध्ये असणाऱ्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या योजणेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळवता येईल आणि त्यांचे विजेचे येणारे बिल कमी करण्यास सरकार सक्षम होणार आहे तसेच लोकांसाठी रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकणार आहे. 


पीएम सूर्य घर मोफत बिजली योजना 2024 या योजनेची थोडक्यात माहिती

pm surya ghar muft bijli yojana maharashtra some information 

योजनेचे नाव 

पीएम सूर्य घर मोफत बिजली योजना 

सुरू करणारे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 

लाभार्थी 

देशातील सर्व नागरिक 

वस्तुनिष्ठ 

मोफत वीज देऊन घरांना प्रकाश देणे 

फायदा 

300 यूनिट मोफत वीज 

बजेट 

75,000 कोटी रुपये 

अर्ज प्रक्रिया 

ऑनलाइन 

अधिकृत संकेतस्थळ 

https://pmsuryaghar.gov.in/

 

पीएम सूर्य घर मोफत बिजली योजना म्हणजे काय ?

pm surya ghar muft bijli yojana maharashtra

पीएम सूर्य घर योजना ही केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी एक योजना आहे या योजनेनुसार देशातील 1 कोटी घरांना वीज पुरवठा करण्यासाठी सोलार पॅनल चा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्य खालील प्रमाणे आहेत. 

  • या योजनेमार्फत लोकांच्या बँक खात्यात थेट दिल्या जाणाऱ्या भरीव सबसीडीपासून ते मोठ्या प्रमाणात सवलतीच्या बँक कर्जापर्यंत, केंद्र सरकार लोकांवर खर्चाचा बोजा पडणार नाही याची काळजी घेणार आहे. 

  • या योजनेचा मुख्य उद्देश हा देशभरात रूफटॉप सोलार सिस्टमला प्रोत्साहन देणे हा आहे आणि या उद्देशाच्या पूर्ततेसाठीच ही योजना राबविण्यात आलेली आहे. 

  • या योजणेमुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त वीज निर्मिती करण्यात येईल आणि यामुळे लोकांना रोजगार पण मिळेल. 


पंतप्रधान सूर्य घर मोफत बिजली योजनेचे उद्दिष्ट 

pm surya ghar muft bijli yojana maharashtra purpose 

  • घरांच्या छतावर सौर पॅनल बसवणे आणि या मार्फत स्वच्छ उर्जेला चालना देणे . 

  • लोकांचे आर्थिक उत्पादन वाढविण्यास मदत करणे. 

  • घरांना मोफत वीज उपलब्ध करून देणे आणि वीज बिल कमी करणे. 

  • लोकांचा आर्थिक बोजा कमी करणे. 

  • या योजणेमुळे लोकांना वीज बिलात बचत करता येणार आहे. 

  • तसेच या योजणेमुळे पर्यावरण संतुलित राहन्यास मदत होईल. 


पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेमार्फत मिळणाऱ्या अनुदानातून खालील सुविधा उपलब्ध होणार आहेत. 


या योजनेच्या बाबतीत सविस्तर माहिती देत असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी खालील बाबी स्पष्ट केल्या 


  • ठोस सबसिडी देण्यात येईल तसेच सवलतीच्या बँकांपासून कर्ज देखील पुरवठा करण्यात येईल. 

  • लोकांवर खर्चाचा बोजा पडणार नाही ही बाब केंद्र सरकार सुनिश्चित करणार आहे. 

  • सर्व लाभार्थी यांना राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलदधारे एकत्रित केले जाईल. 

  • पीएम सूर्य घर योजना या योजनेमार्फत मिळणारे अनुदान हे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. 

  • या योजेणमुळे रोजगार निर्मितीच्या नवनवीन संध्या निर्माण होणार आहेत. 

  • या योजनेला सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतीना त्यांच्या अधिकार क्षेत्रात प्रणालिना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. 

  • तांत्रिक कौशल्य असलेल्या तरुणांसाठी विशेषत: उत्पादन, स्थापना आणि देखभाल या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नवीन संध्या निर्माण होतील. 


पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेनुसार मिळणारे लाभ 

pm surya ghar muft bijli yojana benifits 


अ/ क्र 

मिळणारे सौर पॅनल 

मिळणारे अनुदान 

भरायची रक्कम 

1 किलो वॅट 

18,000 /-

34,500 /-

2 किलो वॅट 

36,000 /-

69,000 /-

3 किलो वॅट 

54,000 /-

1,03,000 /-

    

रूफ टॉप सोलार बसविण्यासाठी लागणारे क्षेत्र, मिळणारे अनुदान, एक, दोन आणि तीन किलो वॅट साठी येणारा साधारण खर्च 


क्षमता (किलो वॅट )

अंदाजे खर्च (रुपये )

मिळणारे अनुदान ( रुपये ) 

प्रत्यक्ष खर्च (रुपये )

छतावरील लागणारी जागा 

बनणारी वीज 

प्रती यूनिट 8 रुपये दराने होणारी बचत (रुपये ) 

52,000/-

18,000/-

34,500/-

100 चौ.फू. 

120 यूनिट 

960 



1,05,000/- 

36,000/-

69,000/- 

200 चौ.फू. 

240 यूनिट 

1,920 


1,57,000/- 

54,000/-

1,03,000/-

300 चौ.फू. 

360 यूनिट 

2,880 


पीएम सूर्य घर मोफत बिजली  योजनेची काही खास वैशिष्ट्ये 


  • घरगुती बिलामध्ये खूप मोठी बचत होईल. 

  • घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना योजनेचा लाभ मिळेल. 

  • 1- 3 किलोवॅट पर्यंत च्या रूफ टॉप सोलार साठी 40% अनुदान मिळेल. 

  • 3 किलो वॅट पेक्षा जास्त ते 10 किलोवॅट पर्यंत 20 % अनुदान मिळेल. 

  • सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट पर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह निवासी गृह निर्माण संस्था या ग्राहकांना 20% अनुदान मिळेल. 

  • शिल्लक लागणारी वीज ही महावितरण मार्फत प्रती यूनिट प्रमाणे विकत घ्यावी लागेल. 


पीएम सूर्य घर मोफत बिजली योजनेसाठी लागणारी पात्रता 

pm surya ghar muft bijli yojana eligibility 

  • केवल भारताचा नागरिक असणाऱ्या नगरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

  • सर्व समाजातील नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत. 

  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असावे. 

  • अर्जदार व्यक्तीकडे स्वत:चे वीज बिल असणे आवश्यक असेल. 

  • अर्जदार नगरिकाच्या परिवारातील एकही सदस्य हा सरकारी नौकरी करणारा नसावा. 



पीएम सूर्य घर मोफत बिजली योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 

pm surya ghar muft bijli yojana important documents 

  • आधार कार्ड 

  • पॅन कार्ड 

  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र 

  • पत्त्याचा पुरावा 

  • लाइट बिल 

  • शिधापत्रिका 

  • मोबाइल नंबर 

  • बँक खात्याचे पासबूक 


पीएम सूर्य घर मोफत बिजली योजनेसाठी असणारी अर्जप्रक्रिया 


या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. 


सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला पीएम सूर्य घर मोफत बिजली योजना pm surya ghar muft bijli yojana maharashtra या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.



pm surya ghar muft bijli yojana maharashtra

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.