राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती योजना / State Government Daxshina Adhichatra Scholarship 2024

state-government-daxshina-adhichatra-scholarship

State Government Daxshina Adhichatra Scholarship 2024 : - नमस्कार विद्यार्थी मित्रहो आज या लेखामध्ये राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती योजना या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, लागणारी पात्रता, मिळणारी शिष्यवृत्ती आणि असणारी अर्जप्रक्रिया अशी संपर्ण माहिती पाहणार आहोत. 

मित्रहो तुम्हाला पण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य वाचा . 


ही योजना महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालय विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते.


राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती योजना उद्देश 

State Government Daxshina Adhichatra Scholarship Purpose
  • विद्याथ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • विद्यार्थ्यांच्या मनात शक्षणाची रुची निर्माण करणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्तता करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनविणे.
  • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे.
  • कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये.
  • पैशाअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची गरज भासू नये.

राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती योजना वैशिष्ट्य 

State Government Daxshina Adhichatra Scholarship Speciality
  •  या योजनेमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनतील त्यांना पैशासाठी कोणावर ही अवलंबून राहायची गरज राहणार नाही. 
  • भरपूर विद्यार्थी ही आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत असतात अश्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. 
  • ही योजना महाराष्ट्र  शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालय विभागाकडून राबविण्यात आली आहे.
  • या योजनेनुसार मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.
  • या योजनेसाठी असणारी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन व सोपी करण्यात आली आहे ज्यामुळे अर्जदार विद्यार्थी ही घरी बसून मोबाईल आणि लॅपटॉप च्या सहाय्याने अर्ज करून शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू शकतील ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्हीपण बचत होतील. 
  • या योजनेचा लाभ मुलगा आणि मुलगी दोघेपण घेऊ शकणार आहेत. 

राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती योजना मिळणारे लाभ 

State Government Daxshina Adhichatra Scholarship Benifits 


या योजनेनुसार खालील प्रमाणे शासकियमहाविद्यालय / संस्था यामधील 54 व विद्यापीठामधील 22 असे एकूण 76 संच मंजूर आहेत. 


अ / क्र 

महाविद्यालयाचे नाव 

संच 

शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद 

06 

इस्माईल युसफ महाविद्यालय मुंबई 

04 

शासकीय विधी महाविद्यालय मुंबई 

04 

सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय मुंबई 

04 

शासकीय विज्ञान संस्था मुंबई 

06 

एलफिन्स्टन महाविद्यालय मुंबई  

06 

शासकीय विज्ञान संस्था नागपूर 

06 

वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था नागपूर 

06 

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती 

06 

10 

राजाराम महाविद्यालय कोल्हापूर 

06 


एकूण 

54 


अ / क्र 

विद्यापीठाचे नाव 

संच 

01 

मुंबई विद्यापीठ मुंबई 

04 

02 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे  

04 

03 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर 

04 

04 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद 

04 

05 

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई 

02 

06 

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 

04 


एकूण 

22 


दि. 05/02/2004 रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ही शिष्यवृत्ती मंजूर होणाऱ्या विद्यार्थ्यांना 250 रुपये प्रमाणे दहा महिन्यांकरीत रक्कम रुपये 2500 शिष्यवृत्ती देण्यात येईल. 


राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती योजना लागणारी पात्रता 

State Government Daxshina Adhichatra Scholarship eligibility

  • अर्जदार विद्यार्थी ही महाराष्ट्र राज्यातील राहिवशी असणे बंधनकारक आहे. 
  • महाराष्ट्र राज्याबाहेर शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. 


राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती योजना नूतनीकरण प्रक्रिया 

State Government Daxshina Adhichatra Scholarship Renewal Procedure

ही योजना नूतनीकरण करण्यासाठी खालील बाबी आवश्यक असणार आहेत. 


  • ही योजना समाधानकारक प्रगती , नियमित उपस्थिती आणि चांगली वर्तवणूक असेल तर विहित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत चालू राहील. 
  • योजना नूतनीकरण करण्यासाठी विद्यार्थ्याने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील application id चा उपयोग करावा. 

राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती योजना लागणारी कागदपत्रे 

State Government Daxshina Adhichatra Scholarship Documents
  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • रहिवाशी प्रमाणपत्र 
  • मागच्या वर्षाची गुणपत्रिक 
  • बोनफाईड प्रमाणपत्र 




राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती योजना अर्जप्रक्रिया 

State Government Daxshina Adhichatra Scholarship Application Procedure

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी  अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 


सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती योजना State Government Daxshina Adhichatra Scholarship 2024 या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.


                                                     state government daxshina adhichatra scholarship 2024

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.