अनुसुचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना 2024

 vocational-training-fee-reimbursement-for-the-students-belonging-to-scheduled-tribe-category


Vocational Training Fee Reimbursement For The Students Belonging To Scheduled Tribe Category :- महाराष्ट्र राज्यसरकार हे राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नेहमीच वेळोवेळी विविध योजना राबवित असते. आशा विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्याचा सकारात्मक प्रयत्न करत असते. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे शिक्षण पूर्ण करून नोकरीला लावणे हे ध्येय सरकारचे आहे हेच ध्येय समोर ठेऊन सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात आली आहे.


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पीपीपी योजनेनुसार उपलब्ध असणाऱ्या जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाइन पध्दतीने प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात आली आहे.


व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना उद्देश 

Vocational Training Fee Reimbursement For The Students
 Belonging To Scheduled Tribe Category Purpose 

  • विद्याथ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची रुची निर्माण करणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनविणे.
  • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे.
  • कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये.
  • पैशाअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची गरज भासू नये.

व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना उद्दिष्ट 

Vocational Training Fee Reimbursement For The Students Belonging To
Scheduled Tribe Category Speciality

  • या योजनेमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनतील त्यांना पैशासाठी कोणावर ही अवलंबून राहायची गरज राहणार नाही. 
  • भरपूर विद्यार्थी ही आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत असतात अश्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. 
  • ही योजना महाराष्ट्र  शासनाच्या सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबविण्यात आली आहे.
  • या योजनेनुसार मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.
  • या योजनेसाठी असणारी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन व सोपी करण्यात आली आहे ज्यामुळे अर्जदार विद्यार्थी ही घरी बसून मोबाईल आणि लॅपटॉप च्या सहाय्याने अर्ज करून शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू शकतील ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्हीपण बचत होतील. 
  • या योजनेचा लाभ मुलगा आणि मुलगी दोघेपण घेऊ शकणार आहेत.

 व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना मिळणारे लाभ 

Vocational Training Fee Reimbursement For The Students Belonging To Scheduled
Tribe Category Benifits

  • एस.एस.सी.उत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 2,50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असेल तर या योजनेकरिता पात्र नाही. भारत सरकार शिष्यवृत्ती करीता अर्ज करावा.
  • एस.एस.सी.उत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 2,50,000/- आणि 8 लाख किंवा 8 लाखापेक्षा कमी असेल तर प्रशिक्षण शुल्क्‍ च्या 100% प्रतिपुर्ती.
  • एस.एस.सी.अनउत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापर्यंत असेल तर प्रशिक्षण शुल्क्‍ च्या 100% प्रतिपुर्ती.

व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना पात्रता 

Vocational Training Fee Reimbursement For The Students Belonging To
Scheduled Tribe Category Eligibility

  • शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प्‍ कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेला असावा.
  • मॅनेजमेंट कोटा प्रवेशासाठी शिष्यवृत्ती नाही.
  • विदयार्थी अनुसुचित जाती प्रवर्गातील असावा.त्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • विदयार्थ्यांच्या कुटुंबाचे मागिल वर्षातील एकत्रित वार्षिक उत्पन्न्‍ रु.8.00 लाखाच्या मर्यादेत असावे.
  • अनाथ विदयार्थ्यांना शिफारस पत्र आवश्यक आहे.
  • उमेदवाराने यापुर्वी शासकीय किंवा खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थेकडुन कोणताही लाभ घेतलेला नसावा.
  • राज्य /केंद्र शासनाच्या विभागाने अथवा त्यांच्या अधिपत्याखालील स्थानिक प्राधिकरण,कंपन्या अथवा महामंडळे यांनी पुरस्कृत केलेल्या कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमाचा यापुर्वी लाभ घेतलेला नसावा.
  • विदयार्थी महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
  • शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेअंतर्गंत महासंचालक,प्रशिक्षण नवी दिल्ली,(DGT) अथवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद (MSCVT) यांनी मान्यता दिलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकडयांचा प्रवेशित जागांवर प्रवेश घेणे बंधनकारक राहील.
  • उपस्थितीचे निकष अनिवार्य आहेत.
  • अर्जदार विदयार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षा अथवा वर्षाची परिक्षा देणे आवश्यक राहील.केवळ विशिष्ट परिस्थितीत विशेषत: आजारपणाच्या कारणास्तव परिक्षा देणे शक्य झाले नसल्यास तसे विदयार्थी व संबधित संस्थेने शिफारस केल्यानंतर सहसंचालक,प्रादेशिक विभाग यांनी प्रमाणीत करणे आवश्यक आहे.
  • संबधित विदयार्थी स्वत:च्या चुकीच्या वर्तनामुळे समाधानकारक शैक्षणिक प्रगती करत नसल्याबाबत किंवा संबंधित प्राधिका-याच्या पुर्वपरवानगीशिवाय अनियमित असणे अथवा गैरहजर रहाणे इत्यादी स्वरुपाचे गैरवर्तन करत असल्याबाबत शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने निदर्शनास आणले तर अशा विदयार्थ्याकरिता संस्थेला शुल्क्‍ प्रतिपुर्ती अनुज्ञेय राहणार नाही.

व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना Renewal Policy 

Vocational Training Fee Reimbursement For The Students Belonging To
Scheduled Tribe Category Renewal Policy

  • विदयार्थ्यी पुढील वर्षी हजेरीपटावर असावा.
  • डीजीटी, नवी दिल्ली यांच्या निकषानुसार हजेरी आवश्यक.

व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना लागणारी कागदपत्रे 

Vocational Training Fee Reimbursement For The Students Belonging To Scheduled
Tribe Category Important Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मार्कशीट दहावी/बारावी
  • नुतनीकरणासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका
  • महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र
  • सक्षम प्राधिका-याने निर्गमित केलेलो उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र

व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना अर्जप्रक्रिया


या  योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 


सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला अनुसुचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना Vocational Training Fee Reimbursement For The Students Belonging To Scheduled Tribe Category या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.





Vocational Training Fee Reimbursement For The Students Belonging To Scheduled Tribe Category



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.